Delivery Boy|Online Shoping Esakal
देश

Work On Voting Day: मतदानाच्या दिवशी डिलिव्हरी बॉईजना सुट्टी नाही; फ्लिपकार्ट, टाटा अन् बिग बास्केटविरोधात तक्रार

Delivery Boy: "हे डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या अधिकारांचे उल्लंघन आहे, विशेषत: जे या प्लॅटफॉर्मच्या कार्यासाठी महत्त्वाचे आहेत."

आशुतोष मसगौंडे

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आणि टाटा ग्रुप युनिट बिगबास्केट विरुद्ध तामिळनाडू राज्य निवडणूक आयुक्त बी कोठी निर्मलासामी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या कंपन्यांनी मतदानाच्या दिवशी म्हणजे 19 एप्रिल रोजीही राज्यात 'डिलिव्हरी स्टाफ'मार्फत वस्तू पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे, त्या दिवशी मतदान असल्यामुळे सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

बुधवारी तामिळनाडूचे राज्य निवडणूक आयुक्त बी कोठी निर्मलासामी यांच्यासमोर दाखल केलेल्या तक्रारीत, चेन्नई उच्च न्यायालयाचे वकील के नरसिम्हन म्हणाले की, राज्य सरकारने 19 एप्रिलला निवडणुकीच्या दिवशी सुट्टी जाहीर केली असली तरी, फ्लिपकार्ट आणि बिगबास्केट ऑर्डर्स डिलिव्हर करण्याचे आश्वासन देत आहेत.

नरसिम्हन म्हणाले की, सरकारी आदेशानुसार, निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी 'निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट 1881' च्या कलम 25 अंतर्गत 19 एप्रिलला अधिकृतपणे सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

ते म्हणाले की, तामिळनाडूच्या कामगार कल्याण आणि कौशल्य विकास विभागाने लोकशाही प्रक्रियेत त्यांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी दुकाने, व्यावसायिक आस्थापना, औद्योगिक आस्थापना आणि आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना 19 एप्रिल रोजी सशुल्क सुट्टी देणे बंधनकारक केले आहे.

" आमच्या निदर्शनास असे आले आहे की, निर्देश दिले असूनही फ्लिपकार्ट आणि बिग बास्केट सारखे ऑनलाइन वितरण प्लॅटफॉर्म 19 एप्रिल रोजी वितरण सेवांची पुरवण्याचे आश्वासन देत ​​आहेत," असे तक्रारीत म्हटले आहे.

"हे डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या अधिकारांचे उल्लंघन आहे, विशेषत: जे या प्लॅटफॉर्मच्या कार्यासाठी महत्त्वाचे आहेत."

तक्रारदाराने मतदानाच्या दिवशी खात्रीशीर वितरणाच्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या दाव्यांची चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. आणि सर्व कामगारांचे लोकशाही अधिकार राखण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, असे तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारीनंतर फ्लिपकार्टकडून मिळालेल्या माहितीनुसार, केवळ पात्र कर्मचाऱ्यांनाच मतदानासाठी पगारी रजा दिली जात आहे. त्यांनी असेही सांगितले की मतदानाच्या दिवसासाठी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे फ्लिपकार्ट ग्रुपमधील अधिकाऱ्यांनी दिली आहेत. तसेच मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US reduces tariff for India : मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरीफ कमी केला; ट्रम्प यांची घोषणा

Manipur Government Formation : भाजपकडून मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग!, 'NDA'चे सर्व आमदार दिल्लीत दाखल

Apple Valentine Offer : ‘अ‍ॅपल’ने लाँच केली ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर!

Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी

Mohol Leopard News : मोहोळ शहरा नजीक आढळलेले बिबट्या सदृश्य प्राणी हे बिबटे नसून मार्जर कुळातील रान मांजर वनविभागाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT