Platlates_Mosambi Juice
Platlates_Mosambi Juice 
देश

Dengue: 'त्या' रुग्णाचा मृत्यू खरंच मोसंबीच्या ज्यूसमुळं झाला होता? धक्कादायक कारण आलं समोर

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथल्या ग्लोबल हॉस्पिटल अँड ट्रॉमा सेंटरमध्ये डेंग्यूच्या एका रुग्णाचा मृत्यू प्लेटलेट्सऐवजी मोसंबीचा ज्यूस चढवल्यानं झाल्याची चर्चा सुरु होती. योगी सरकारनं या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीनंतर यामध्ये एक मोठा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे. रुग्णाचा मृत्यू मोसंबीचा ज्यूस चढवल्यानं नव्हे तर खराब प्लेटलेट्समुळं झाल्याचं समोर आलं आहे. (dengue patient really die from Mosambi juice a shocking reason came up)

या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीनंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं की, रुग्णालयात डेंग्यूच्या रुग्णाचा मृत्यू झाला होता कारण त्याला खराब प्लेटलेट्स देण्यात आल्या होत्या, मोसंबीचा ज्यूस नव्हे. दरम्यान, प्रयागराज विकास प्राधिकरणानं या रुग्णालयाची इमारत कुठलाही नकाशा पास न करता बांधल्याची नोटीस देत ती उद्ध्वस्त करण्याची नोटीस पाठवली होती. त्यामुळं ही इमारत पाडली जाऊ शकते.

काय होतं संपूर्ण प्रकरण?

बमरौली येथील रहिवासी प्रदीप पांडे यांना डेंग्यूची लागण झाली होती. त्यामुळं त्यांना उपचारांसाठी झलवा इथल्या ग्लोबल हॉस्पिटल अँड ट्रॉमा सेंटरमध्ये १४ ऑक्टोबर रोजी भरती करण्यात आलं होतं. त्यानंतर १६ ऑक्टोबर रोजी प्लेटलेट्सची संख्या १७ हजारांवर पोहोचल्यानं त्यांना तीन युनिट प्लेटलेट्स चढवण्यात आल्या होत्या. या प्लेटलेट्स चढवल्यानंतर रुग्णाची प्रकृती आणखीनच ढासाळली होती. त्यानंतर रुग्णालयानं त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हालवण्यास सांगितलं. पण १९ ऑक्टोबर रोजी पांडे यांचा मृत्यू झाला.

यानंतर मृत्यू झालेल्या प्रदीप पांडे यांचे मेव्हणे सौरभ त्रिपाठी यांनी ग्लोबल हॉस्पिटल अँड ट्रॉमा सेंटरवर आरोप केले की, प्लेटलेट्सऐवजी रुग्णाला मोसंबीचा ज्यूस चढवण्यात आला होता. यामुळं रुग्णाच्या रक्तवाहिन्या फुटल्या आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर या प्रकाराची गंभीर दखल घेत उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांनी हे रुग्णालय सील करण्याचे आदेश देत या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: POK भारताचे आहे अन् आम्ही ते परत घेऊ; अमित शाह यांचा इशारा

Mahadev App: महादेव बेटिंग अ‍ॅपचे पुणे कनेक्शन, व्यापाऱ्यासह 70 जणांना अटक

IPL 2024 : 18 मे रोजी होणारा RCB Vs CSK सामना पावसामुळे रद्द झाला तर… प्लेऑफसाठी कोण ठरणार पात्र?

Lok Sabha Election: INDIA आघाडीला किती जागा मिळणार? काँग्रेस नेत्याने पहिल्यांदाच केला एवढा मोठा दावा

Car Care: कडक उन्हात कार आतील बाजूस थंड ठेवण्यासाठी आजच करा 'या' 5 गोष्टी

SCROLL FOR NEXT