NEET examination_File Photo 
देश

NEETच्या क्लासला प्रवेश नाकारला, १८ वर्षीय विद्यार्थीनीची आत्महत्या! काय घडलंय वाचा?

यापूर्वी नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्यानं तामिळनाडूमध्ये आत्महत्या केली होती.

सकाळ डिजिटल टीम

चेन्नई : NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या एका १८ वर्षीय तरुणानं रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आत्महत्येचं कारण ऐकून तर तुम्हाला धक्काच बसेल. नीटच्या क्लासमध्ये प्रवेश नाकारल्यानं या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे. (Denied entry by coaching centre Tamil Nadu NEET aspirant jumps before moving train)

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्टची (NEET) तयारी करणाऱ्या निशा उथिराभारती नामक १८ वर्षीय विद्यार्थीनीनं रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केली. तिच्या पालकांनी सांगितलं की, बायजूजच्या कोचिंग क्लासमध्ये निशा जात होती. पण गेल्याकाही दिवसांपासून ती काहीशी नाराज होती. कारण क्लासमध्ये त्याच्या चाचणी परीक्षेतील गुणांवरुन काही विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट तयार केले होते. या चाचणीत माझ्या मुलीला ३९९ गुण मिळाले. पण बायजूजच्या नेवयेली शाखेनं ज्या विद्यार्थ्यांना ४०० पेक्षा अधिक गुण असतील अशाच विद्यार्थ्यांना वेगळं स्पेशल कोचिंग देण्याचा निर्णय घेतला होता. यामुळं निशा डिप्रेशनमध्ये गेली होती. याप्रकरणी तिच्या वडिलांनी कोचिंग सेंटरवर कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, निशानं तिच्या वडिलांना सांगितलं होतं की, ती विशेष क्लाससाठी चालली आहे. पण ती थेट वंडालूर रेल्वे स्टेशनवर गेली आणि तिथं तीनं धावत्या ट्रेनखाली संध्याकाळी सव्वापाचच्या दरम्यान उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर रेल्वेच्या लोको पायलटने रेल्वे थांबवण्याचा प्रयत्नही केला. पण निशा यातून वाचू शकली नाही. या घटनेची माहिती कळताच रेल्वे प्रोटेक्शन फोर्सची टीम (RPF) घटनास्थळी पोहोचली. त्यांनी निशाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि सरकारी रुग्णालयात पाठवून शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.

हे ही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

NEET ही यापूर्वीची ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट (AIPMT) असून ही भारतीय महाविद्यालयांमधील एमबीबीएस आणि बीडीएसच्या अभ्यासक्रमाची पात्रता परीक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Latest Maharashtra News Updates : मध्य वैतरणा धरणाचे तीन दरवाजे उघडले, लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

SCROLL FOR NEXT