Deputy Chief Minister dk Shivakumar met Laxman Savadi at Belgaum esakal
देश

Belgaum : मंत्रिपद हुकल्याने सवदी नाराज? डीके शिवकुमारांनी घेतली तातडीनं भेट; दोघांत अर्धा तास चर्चा

शिवकुमार आणि सवदी यांच्यात बेळगावमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली.

सकाळ डिजिटल टीम

सवदींनी अथणी मतदारसंघातून एकहाती विजय मिळविला. शिवाय, त्यांनी कुडची-कागवाडमधील काँग्रेस उमेदवारांना निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

बेळगाव : आमदार लक्ष्मण सवदी (Laxman Savadi) यांना संभाव्य मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता असताना अखेरच्या क्षणी त्यांचे नाव मागे पडले. त्या पार्श्वभूमीवर सवदी यांची भेट घेऊन नाराजी दूर करण्याबाबत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी प्रयत्न केले.

दरम्यान, शिवकुमार आणि सवदी यांच्यात बेळगावमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. यावेळी शिवकुमार यांनी आमदार सवदींना योग्य स्थान देण्याची ग्वाही दिली.

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी डावलण्यात आल्यामुळे भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात दाखल झालेले सवदी यांनी अथणी मतदारसंघातून एकहाती विजय मिळविला. शिवाय त्यांनी कुडची व कागवाडमधील काँग्रेस उमेदवारांना निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

त्यामुळे संभाव्य मंत्रिपदाच्या यादीत सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर, प्रकाश हुक्केरी यांच्यासह लक्ष्मण सवदी यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात जारकीहोळी, हेब्बाळकर यांना संधी मिळाली. त्यामुळे हुक्केरींसह सवदी नाराज असल्याची चर्चा होती.

त्यापैकी सवदी यांची शिवकुमार यांनी तातडीने भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचीही भेट घेणार असल्याचे सांगितले. विधानसभेला अन्य पक्षांतील नेत्यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढविल्यामुळे पक्षाची ताकद वाढली. निवडणुकीत काही जणांनी विजय मिळविला आहे, तर काहींचा पराभव झाला.

तरीही पक्षातील महत्त्वाचे नेते असल्यामुळे प्रत्यक्ष भेटी घेण्यासाठी आल्याचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी शासकीय विश्रामगृहात बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिवकुमार म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि धजदमधील अनेकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत पक्षाची ताकद वाढविली. पक्ष संघटना व इतरांच्या सहकार्यामुळे बहुमत मिळाले, पण मंत्रिमंडळ विस्तार, शपथविधी आणि बैठकांमुळे काही नेत्यांशी बोलणे झाले नाही.

त्यांची भेटही होऊ शकली नाही. त्यामुळे तातडीने दौरा जाहीर करत भेट घेतली.’’ यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार बाबासाहेब पाटील, महेंद्र तम्मनवर, विश्वास वैद्य, चन्नराज हट्टीहोळी, आसिफ सेठ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT