Deranged serial killer Deranged serial killer
देश

प्रेम, लैंगिक संबंध अन् खून; पोलिसांनी केली विक्षिप्त किलरला अटक

सकाळ डिजिटल टीम

मुलींना प्रेमसंबंधात अडकवून लैंगिक संबंध प्रस्थापित करायचा. नंतर मुलींची हत्या करायचा. विक्षिप्त सिरीयल किलरला राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा मुलींना प्रेमात अडकवल्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. मन भरल्यानंतर हत्या (Murder) करून मृतदेहाची विल्हेवाट लावायचा. या किलरने तीन मुलींची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती राजस्थान पोलिसांनी दिली. यापैकी एक मुलगी ग्वाल्हेरची आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय युवती ग्वाल्हेरच्या गोल का मंदिर परिसरातून बेपत्ता झाली होती. ती भावासोबत मेव्हण्याकडे राहायला आली होती. ४ एप्रिलला कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर गोला का मंदिर पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तेव्हापासून पोलिस मुलीचा शोध घेत होते. मात्र, पोलिसांना कोणताही सुगावा लागत नव्हता.

दरम्यान, राजस्थान पोलिसांनी सायको किलर मिंटू ऊर्फ ​​विक्रांतला पकडले. त्याने तीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून शारीरिक संबंध ठेवल्यानंतर हत्या (Murder) केल्याची कबुली दिली. तीन मुलींपैकी एक युवती ग्वाल्हेरची होती. जयपूर पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर ग्वाल्हेर पोलिस किलरची चौकशी करण्यासाठी राजस्थानला रवाना झाले आहेत.

मृतदेह रेल्वे रुळावर फेकायचा

आरोपी हा मुलीला कधी डॉक्टर, कधी डीएसपी, तर कधी गुन्हे शाखेचा अधिकारी सांगून अडकवायचा. मुलीला प्रेमात (love) फसवल्यानंतर शारीरिक संबंध ठेवायचा. मुलीने विरोध केला तर मारून (Murder) टाकायचा. हत्येनंतर ही घटना अपघात म्हणून भासावी म्हणून तो मृतदेह रेल्वे रुळावर फेकून देत असे, असे ग्वाल्हेरचे पोलिस अधीक्षक अमित सांघी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : भारतीय देशांतर्गत हवाई क्षेत्र जगात सर्वाधिक वेगाने विकसित होत असून सध्या ते तिसऱ्या क्रमांकावर - मोहन नायडू

SCROLL FOR NEXT