Digambar Jain Muni murder CM Siddaramaiah  esakal
देश

Jain Muni Murder Case : मुख्यमंत्र्यांकडून भाजपची 'ही' मागणी मान्य; विधानसभेत केली मोठी घोषणा

जैन मुनींची आर्थिक व्यवहारातून हत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे.

सकाळ डिजिटल टीम

हिरेकुडी गावातील नारायण माळी आणि हुसेन दलायत यांना हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

बंगळूर : राज्यभर चर्चेत आलेल्या बेळगाव जिल्ह्यातील जैनमुनी १०८ कामकुमार नंदी महाराज (Digambar Jain Muni Kamkumar Nandi Maharaj) यांच्या हत्येप्रकरणी राज्य सरकारनं सीआयडी (CID) तपासाचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी बुधवारी विधानसभेत ही घोषणा केली. आर्थिक कारणावरून जैन मुनींची हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पण, हत्या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपनं केली होती.

मात्र, आता हे प्रकरण सीआयडीकडं तपासासाठी देणार असल्याचे सांगितले. कामकुमार नंदी महाराज ६ जुलैपासून हिरेकुडीतील (Hirekodi in Chikkodi Taluk) आश्रमात सकाळपासून दिसले नाहीत. भक्तांनी सर्वत्र शोध घेतला तरी महाराज सापडले नाहीत. त्यामुळे त्यांनी चिक्कोडी पोलिस (Chikkodi Police) ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. रायबाग तालुक्यातील कटकभावी गावाच्या हद्दीत त्यांचा मृतदेह कुपनलिकेत फेकल्याची माहिती आरोपींनी दिली होती. त्यामुळे पोलिसांनी रात्रीपासूनच कारवाईला सुरुवात केली.

२० फूट खोलवर मृतदेह सापडला. जैन मुनींची आर्थिक व्यवहारातून हत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. हिरेकुडी गावातील नारायण माळी आणि हुसेन दलायत यांना हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आरोपींना महाराजांनी आर्थिक मदत केली होती. महाराज पैसे परत करण्यास सांगितल्याने ही हत्या झाल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत कोट्यवधींचं घर विकलं अन् घेतली बाईक! कारण काय? स्टार्टअप फाउंडरने सांगितली धक्कादायक निर्णयामागची कहाणी

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा, संयुक्त जमीन मोजणीला गती द्या; शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाहन

Marathi News Live Updates : पुण्यातील नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

Encroachment : नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

SCROLL FOR NEXT