Air India Urination Case esakal
देश

Air India : विमानात महिलेच्या अंगावर लघवी, आरोपीवर चार महिन्यांची बंदी; वकील म्हणाले, माझा क्लायंट..

Air India नं आरोपी शंकर मिश्राच्या विमान प्रवासावर पुढील 4 महिने बंदी घातली आहे.

सकाळ डिजिटल टीम

माझ्या क्लायंटवर चार महिन्यांसाठी बंदी घालण्याच्या समितीच्या निर्णयाशी मी असहमत आहे.

Air India Urination Case : एअर इंडियाच्या विमानात शंकर मिश्रा (Shankar Mishra) या व्यक्तीनं महिला प्रवाशावर लघुशंका केल्याचं प्रकरण आता कोर्टात पोहोचलंय.

26 नोव्हेंबरला एअर इंडियाच्या पॅरिस-दिल्ली विमान (Paris-Delhi) प्रवासात मद्यधुंद अवस्थेतील शंकर मिश्रानं महिला प्रवाशावर लघुशंका केली. याप्रकरणी शंकर मिश्राला अटक करण्यात आली असून कोर्टात (Court) याप्रकरणी सुनावणी सुरु आहे.

दरम्यान, Air India नं आरोपी शंकर मिश्राच्या विमान प्रवासावर पुढील 4 महिने बंदी घातली आहे. त्यामुळं मिश्रा 4 महिने एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करु शकणार नाहीये. बंदी घातल्यानंतर मिश्राच्या वकिलानं यावर आपली प्रतिक्रिया दिलीये.

वकील अक्षत वाजपेयी म्हणाले, माझ्या क्लायंटवर चार महिन्यांसाठी बंदी घालण्याच्या समितीच्या निर्णयाशी मी असहमत आहे. आम्ही कोर्टात अपील दाखल करण्याच्या प्रक्रियेत आहोत. या प्रकरणात माझा क्लायंट पूर्णपणे निर्दोष आहे. आम्ही मिश्रांच्या पाठीशी उभे असून देशाच्या न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे, असं त्यांनी नमूद केलंय.

विमानात काय घडलं होतं?

न्यूयॉर्कहून दिल्लीला (New York To Delhi Flight) जाणाऱ्या विमानात 26 नोव्हेंबरला ही घटना घडली होती. एक महिला प्रवासी या विमानातून प्रवास करत होती. फ्लाईट AI-102 हे विमान दुपारी एक वाजता न्यूयॉर्कच्या जेएफके विमानतळावरुन रवाना झालं. काही वेळ वातावरण शांत होतं. पण, विमानानं उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच नशेत असलेला शंकर मिश्रा त्या महिलेच्या सीटजवळ गेला आणि पँटची झीप उघडून त्यानं महिलेवर लघुशंका केली. त्यानंतर महिलेनं तक्रार दाखल केली.

शंकर मिश्रावर विमान प्रवासाला बंदी

26 नोव्हेंबरला घडलेल्या या घटनेप्रकरणी एअर इंडियाकडून पोलिसांत तक्रार (Police Complaint) दाखल करण्यात आली. त्यानंतर एअर इंडिया व्यवस्थापननं एका समितीचीही स्थापना केली. आक्षेपार्ह वर्तणूक करणाऱ्या शंकर मिश्राला नो फ्लाई लिस्टमध्ये टाकण्यात आलं असून त्याच्यावर पुढील 4 महिने प्रवास बंदी घालण्यात आलीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT