covaxin
covaxin 
देश

स्वदेशी ‘कोव्हॅक्सिन’ देशभरात पोचली; दिल्लीसह ११ शहरांमध्ये लशींचे वितरण

सकाळन्यूजनेटवर्क

हैदराबाद - कोरानाला रोखण्यासाठी भारतातील लसीकरण मोहिमेला शनिवार (ता.१६) पासून सुरुवात होणार असल्याने सर्वत्र लस वितरित केली जात आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्डनंतर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशींचे वितरण बुधवारी सकाळी ११ शहरांमध्ये झाले. कंपनीने सरकारला १६.५ लाख डोस मोफत दिले आहेत.

कोव्हॅक्सिन लशींची पहिली खेप सकाळी नवी दिल्लीत पोचली. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी एअर इंडियाच्या विमानाने लशींच्या कुपींसह दिल्लीला उड्डाण केले. दिल्लीसह ११ शहरांमध्ये ही लस पोचली. हैदराबादहून लशींच्या तीन पेट्या दिल्ली विमानतळावर पोचल्या. त्यांचे वजन ८०. ५ किलोग्रॅम होते. संपूर्ण स्वदेशी असलेल्या कोव्हॅक्सिनची निर्मिती भारत बायोटेकने भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था यांच्या मदतीने करण्यात आली आहे. 

कोरोनाला अटकाव करण्यासाठी सार्वजनिक भागीदारीतून पहिली भारतीय लस विकसित करण्यात यश आल्याने कंपनीने देश, वैद्यकीय चाचणीत सहभागी झालेले स्वयंसेवक आणि त्यांच्या भागीदार संस्थांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 

कोव्हॅक्सिनचे वितरण
केंद्र सरकारकडून ५५ लाख डोस खरेदीचा प्रस्ताव मिळाल्यानंतर लशींच्या कुपींची (प्रत्येत कुपीत २० डोस) पहिली खेप रवाना.

दिल्ली, पुणे, गन्नवरम, बंगलोर, कुरुक्षेत्र, गुवाहाटी, पाटणा, भुनवेश्‍वर, जयपूर, चेन्नई व लखनौला वितरण.

‘सार्स-सीओव्ही-२’ या नावाने ओळखली जाणाऱ्या या लशीचे दोन डोस अत्यंत परिणामकारक असल्याचा कंपनीचा दावा.

जगातील अत्यंत उच्च दर्जाच्या सुरक्षित वातावरणात निर्मिती.

आतापर्यंत ३० कोटी डोस तयार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT