Mistakes In Writing Prescriptions ESakal
देश

Prescriptions: रुग्णांच्या जीवाशी खेळ! प्रत्येक दहाव्या व्यक्तीच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये गंभीर त्रुटी, भोगावे लागतात 'हे' गंभीर परिणाम

Patients: प्रिस्क्रिप्शनमध्ये आढळलेल्या त्रुटींमुळे रुग्णांपैकी सुमारे सहा टक्के रुग्णांचा उपचार खर्च वाढला. तर पाच टक्के रुग्णांना औषधाचे गंभीर दुष्परिणाम झाले.

आशुतोष मसगौंडे

Mistakes In Writing Prescriptions:

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या पुढाकाराने 13 रुग्णालयांमध्ये केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, OPD मध्ये उपचारासाठी जाणाऱ्या 44.87 टक्के रुग्णांचे प्रिस्क्रिप्शन लिहिताना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात नाही.

प्रत्येक दहाव्या रुग्णाला लिहिलेल्या औषधाच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये गंभीर त्रुटी असतात. त्यामुळे रुग्णांना गंभीर दुष्परिणाम सहन करावे लागत आहेत.

नुकताच हा अभ्यास इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित झाला आहे. एम्स दिल्ली, सफदरजंग, एम्स भोपाळ, केईएम मुंबई, पीजीआय चंदीगड, इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस पाटणा यासह 13 रुग्णालयांच्या फार्माकोलॉजी विभागाच्या डॉक्टरांनी संयुक्तपणे अभ्यास केला आहे.

ऑगस्ट 2019 ते ऑगस्ट 2020 दरम्यान, सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील त्या रुग्णालयांच्या सामुदायिक औषध, सामान्य औषध, शस्त्रक्रिया, बालरोग, स्त्रीरोग, त्वचारोग आणि नेत्ररोग विभागाच्या ओपीडीमध्ये उपचार घेतलेल्या 4,838 रुग्णांचे प्रिस्क्रिप्शन गोळा करून एक अभ्यास केला गेला. यातील केवळ ५५.१ टक्के प्रिस्क्रिप्शनमध्ये डॉक्टरांनी मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य पालन केले होते.

तर 44.87 टक्के प्रिस्क्रिप्शनमध्ये त्रुटी आढळल्या. 38.65 टक्के प्रिस्क्रिप्शनमध्ये औषधाचा डोस, किती वेळा आणि किती वेळ औषध घ्यायचे याचा उल्लेख केलेला नव्हता. प्रिस्क्रिप्शनमध्ये गंभीर त्रुटी 9.8 टक्के (475) प्रिस्क्रिप्शनमध्ये आढळल्या. त्यामुळे अभ्यासात समाविष्ट असलेल्या रुग्णांपैकी सुमारे सहा टक्के रुग्णांचा उपचार खर्च वाढला. पाच टक्के रुग्णांना औषधाचे गंभीर दुष्परिणाम झाले.

आजार बरा होण्यासाठी तसेच औषधाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी रुग्णांना अनावश्यक औषधे लिहून दिली जात असल्याचे अभ्यासात म्हटले आहे. Pantoprazole, Rabeprazole आणि Domperidone यांचा एकत्रित डोस आणि ओरल एन्झाईम्स हे विनाकारण जास्त लिहून दिले जात आहे. अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आणि हायपरटेन्शनसाठी औषधे लिहून देताना अधिक त्रुटी आढळल्या.

रुग्णांना औषधे लिहून देणारे सर्व डॉक्टर एमडी किंवा एमएस होते आणि त्यांना चार ते १८ वर्षांचा अनुभव होता. अनेक रूग्णांना राबेप्राझोल आणि डॉम्पेरिडोनचा एकत्रित डोस अँटासिड्ससह लिहून देण्यात आला, ज्याचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समावेश नाही.

त्याचप्रमाणे, Azithromycin व्यतिरिक्त, FDC Amoxicillin आणि Clavulanic Acid देखील URTI (अपर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन) च्या उपचारांसाठी लिहून दिले होते. प्रतिजैविकांचा गैरवापर केल्याने ते अप्रभावी होण्याचा धोका वाढतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT