Viral News esakal
देश

Viral News: मृत बाळाला तोंडात घेऊन रुग्णालयात फिरत होता कुत्रा!

सोशल मीडियावर त्या एका घटनेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

युगंधर ताजणे

Dog found with dead human foetus: सोशल मीडियावर त्या एका घटनेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हायरल झालेल्या त्या घटनेनं कित्येकांनी आश्चर्यही व्यक्त केले आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था तसेच जिल्हा आरोग्य प्रशासन यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे.

उत्तर प्रदेशातील महराजगंज जिल्ह्या रुग्णालयातील ती घटना भलतीच धक्कादायक आहे. एका मृत नवजात बाळाला तोंडात घेत कुत्रा साऱ्या रुग्णालयात फिरत असल्याचे दिसून आले आहे. त्याविषयी जेव्हा सोशल मीडियावर बातमी व्हायरल झाली तेव्हा प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. अनेकांनी जिल्हा आरोग्य प्रशासनावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आल्याचे त्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील जिल्हा रुग्णालयातील वेगवेगळ्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. ती घटना व्हायरल झाल्यानंतर आता रुग्णालय प्रशासनानं तीन सफाई कर्मचाऱ्यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्या मृत बाळाचा मृतदेह कुटूंबियांनी स्विकारण्यास नकार दिल्यानं ते बाळ एका कचऱ्याच्या डब्यात टाकून देण्यात आले होते.

याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ए के द्विवेदी यांनी पोलिसांकडे त्या सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांना तक्रारीचे निवेदनही दिले आहे. याशिवाय आणखी सहा रुग्णालयाबाबतही त्यांनी तपासणीसाठी नोटीस जारी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT