देश

देशातील सामान्यांपर्यंत लस पोचवू; डॉ. हर्षवर्धन

पीटीआय

चेन्नई - पहिल्या टप्प्यामध्ये अधिक जोखीम असणाऱ्या गटातील लोकांना कोरोनाची लस दिल्यानंतर देशातील सर्वसामान्य नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल. देशातील सगळ्या लोकसंख्येचे लसीकरण करण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज सांगितले. 

देशातील लसीचे लाभार्थी निश्‍चित करण्यासाठी केंद्र सरकारने नवा कोविड प्लॅटफॉर्म तयार केला आहे. या लोकांना नंतर इलेक्ट्रॉनिक प्रमाणपत्र देखील देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. डॉ. हर्षवर्धन यांनी आज राजीव गांधी सरकारी रुग्णालयास भेट देत प्रशासनाकडून घेतल्या जाणाऱ्या ड्राय रनचा आढावा घेतला. भारताने अल्पकाळामध्ये कोरोना लशीची निर्मिती करण्यात यश मिळविले असून सध्या दोन लशींच्या आपत्कालीन वापरास मंजुरी देण्यात आली आहे. आता पहिल्या टप्प्यात अधिक जोखीम गटातील सरकारी आणि खासगी सेवेमध्ये कार्यरत असलेल्या लोकांचे लसीकरण केले जाईल. यासाठीचा पूर्ण आराखडा तयार करण्यात आला आहे असे ते म्हणाले. आरोग्यमंत्र्यांनी यावेळी ओमानदुरार रुग्णालय आणि अन्य केंद्रांना देखील भेट दिली. 

आरोग्यमंत्री म्हणाले 
केंद्र सरकारकडून लसीकरणाची तयारी पूर्ण 
चार ते पाच महिन्यांपासून सरकार सज्ज 
आम्ही तळागाळापर्यंत लस पोचवून दाखवू 
लाखो कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे प्रशिक्षण 
सर्व घटकांपर्यंत लसीकरणाची माहिती पोचविली 
देशामध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक 

सतरा रोजी पोलिओ लसीकरण 
देशातील पाच वर्षांखालील सर्व मुलांना १७ जानेवारी रोजी पोलिओची लस देण्यात यावी असे निर्देश आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिले आहेत. देशातील पोलिओचा रुग्ण तब्बल दहा वर्षांपूर्वी २०११ मध्ये पश्चिम बंगालमध्ये आढळून आला होता असे त्यांनी सांगितले. आता जागतिक आरोग्य संघटनेनेच २०१४ मध्ये भारत पोलिओ मुक्त झाला असल्याचे जाहीर केल्याचे त्यांनी नमूद केले. 

नाकावाटे लशीचा प्रस्ताव 
कोरोनावरील नाकावाटे घ्यायच्या लशीची निर्मिती करण्यात भारत बायोटेक इंटरनॅशनल या कंपनीला यश आले आहे. या लशीच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्यांसाठी कंपनीकडून देशाच्या औषध नियंत्रकांकडे अधिकृत प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या लशीच्या वापरामुळे वैद्यकीय संसाधने आणि उपकरणे यांची मोठ्या प्रमाणावर बचत होईल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

SCROLL FOR NEXT