Draupadi Murmu Latest News Draupadi Murmu Latest News
देश

द्रौपदी मुर्मूंचा विरोध योग्य नाही; काँग्रेस नेत्याचा पक्षाला सल्ला

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ‘पं. मोतीलाल नेहरूंपासून आजपर्यंत काँग्रेस नेहमीच शोषित, वंचित आणि आदिवासींच्या पाठीशी उभी राहिली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (President Election) द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या आदिवासी महिला उमेदवाराला विरोध करणे माझ्या दृष्टीने अजिबात योग्य नाही. पक्षश्रेष्ठींनी याचा फेरविचार करावा’, असे ट्विट आचार्य प्रमोद कृष्णम यांनी करून काँग्रेसला (Congress) इतिहासाची आठवण करून दिली.

विरोधकांनी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलेले यशवंत सिन्हा यांचा पाठिंबा काढून घेण्याचे आवाहन काँग्रेसच्या (Congress) ज्येष्ठ नेत्याने पक्षाला केले आहे. प्रमोद कृष्णम यांच्या ट्विटवर आतापर्यंत कोणत्याही काँग्रेस नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, त्यांना कठोर हल्ल्याला सामोरे जावे लागू शकते, असे मानले जात आहे. यापूर्वी कन्हैयालाल हत्याकांडातही त्यांनी राजस्थान पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आपल्याच सरकारला घेरल्याने त्यांना काँग्रेस नेत्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे (President Election) गणित भाजप समर्थीत उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या बाजूने जात असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत भाजपचा मित्र पक्ष जेडीयू व्यतिरिक्त अकाली दल, तेलगू देसम पार्टी, जगन मोहन रेड्डी यांचा पक्ष वायएसआर काँग्रेस, मायावतींचा पक्ष बसपा, शिवसेना, बीजेडी या पक्षांनी पाठिंबा दिला आहे. या पक्षांमुळे द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्‍चित दिसत आहे. यशवंत सिन्हा यांची उमेदवारी ही औपचारिकता ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अगं बाई... मॅच बघ, मला नको! तिलक वर्माची तरुणीला हात जोडून विनंती; ती नेमकं काय करत होती?

ST Car Accident : मुरबाड-कल्याण मार्गावर पुन्हा अपघात; एसटी-कारच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू

Palghar Crime : अघोरी पूजेनंतर लैंगिक अत्याचार; कासा येथे १३ वर्षांच्या मुलीवर ५५ वर्षीय आरोपीचे कृत्य

West Bengal CM: पश्चिम बंगालमध्ये BJP सरकार स्थापन करणार! मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याची तारीखही ठरली; ब्रिगेड ग्राउंड साक्षीदार ठरणार

IPL 2026 : रोहित शर्मा पुन्हा Mumbai Indians चा कॅप्टन? हार्दिकनंतर सूर्यकुमार यादवही MI vs RCB सामन्याला मुकणार?

SCROLL FOR NEXT