indian army 
देश

लष्करी तळाजवळ ड्रोनच्या घिरटया; आर्मी, स्पेशल फोर्सेस हाय अलर्टवर

कुठल्या भागात ही ड्रोन घिरटया घालत होती

दीनानाथ परब

श्रीनगर: जम्मूमध्ये इंडियन एअर फोर्सच्या बेसवर (IAF Base) ड्रोनद्वारे झालेल्या बॉम्ब (drone attack) हल्ल्याची घटना ताजी असतानाच, आज सुरक्षा दलांना जम्मूमध्ये (jammu) तीन वेगवेळ्या ठिकाणी पुन्हा ड्रोन दिसली आहेत. जम्मूमध्ये ड्रोन दिसण्याचा हा सलग चौथा दिवस आहे. पहाटेच्या सुमारास मिरान साहीब, (miran sahib) कालूचाक आणि कुंजवानी भागात ही ड्रोन घिरटया घालताना दिसल्याची माहिती सुरक्षा दलांनी दिली. (Drones spotted again near military camps in Jammu security forces on alert)

पहाटे ४ वाजून ४० मिनिटांनी कालूचाक येथे पहिले ड्रोन दिसले. त्यानंतर कुंजवानी भागात एअर फोर्स स्टेशनजवळ दुसरे ड्रोन दिसले. सुरक्षा तळाजवळ ही ड्रोन्स उडत होती, असे सूत्रांनी सांगितले. मागच्या चार दिवसात जम्मू आणि लष्करी तळाजवळ सात ड्रोन्स दिसली आहेत. रविवारी जम्मूमध्ये इंडियन एअर फोर्सच्या बेसवर (iaf base attack) झालेल्या हल्ल्यामागे पाकिस्तानच असण्याची दाट शक्यता आहे. कारण तपासात आतापर्यंत हाती आलेले धागेदोरे तसेच संकेत देत आहेत.

रविवारी जम्मूमध्ये उच्च सुरक्षा असलेल्या एअर फोर्स स्टेशनच्या परिसरात पाच मिनिटांच्या अंतराने दोन बॉम्बस्फोट झाले. एटीसी टॉवर आणि तिथे पार्क केलेल्या हेलिकॉप्टरला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने हा हल्ला घडवण्यात आल्याची शक्यता आहे. पहिल्या स्फोटात एकमजली इमारतीच्या छताचे नुकसान झाले, तर दुसरा स्फोट मोकळया जागेत झाला.

"पाच ते सहा किलो वजनाच्या प्रत्येकी दोन IED मध्ये RDX मुख्य स्फोटक होते. ATC आणि हेलिकॉप्टरपासून जवळच हे दोन बॉम्ब टाकण्यात आले. चुकीच्या पद्धतीने ऑपरेट केल्यामुळे हे बॉम्ब लक्ष्यापासून भरकटले किंवा हवेचा जोर जास्त असल्यामुळे हा हल्ला फसला" असे वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले. जम्मूमधील या एअर फोर्स स्टेशनपासून भारत-पाकिस्तान सीमा १४ किमी अंतरावर आहे. यापूर्वी ड्रोन्सचा वापर करुन भारताच्या हद्दीत १२ किमी आतापर्यंत शस्त्रास्त्र टाकण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT