Navratri Durgapooja Sakal
देश

Navratri 2022 : महिषासुराच्या रुपात गांधींजींची प्रतिमा; हिंदू महासभेच्या दुर्गा पूजेवरून वाद

हिंदू महासभेने याबद्दल आपली बाजूही स्पष्ट केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोलकत्यामध्ये दुर्गा पूजेदरम्यान राक्षस म्हणून महात्मा गांधींशी साधर्म्य असलेली प्रतिमा ठेवण्यात आल्याने आता नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रतिमेच्या हातात काठी आहे, तसंच ही प्रतिमा हुबेहुब महात्मा गांधींसारखा दिसतो आहे. आता आयोजकांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

अखिल भारतीय हिंदू महासभेने कोलकत्यामध्ये दुर्गा पूजेमध्ये ही प्रतिमा ठेवली आहे. यामध्ये राक्षसाच्या जागी असलेली मूर्ती हुबेहुब महात्मा गांधींसारखी दिसत आहे. या देखाव्यावर राज्यातली सत्ताधारी तृणमूल काँग्रेस, भाजपा, सीपीआय-एम, काँग्रेस अशा सगळ्याच पक्षांनी टीका केली आहे. याबद्दल स्पष्टीकरण देताना अखिल भारतीय हिंदू महासभेने म्हटलं आहे की, टक्कल पडलेली आणि चष्मा घातलेली व्यक्ती गांधीच असण्याची गरज नाही. या देखाव्यातल्या राक्षसाजवळ ढाल आहे, गांधींजींकडे ढाल नव्हती. या देखाव्यात दुर्गा देवीने वध केलेला राक्षस गांधींसारखा दिसणे हा केवळ योगायोग आहे.

तृणमूल काँग्रेसने या प्रकारावरुन टीका करताना म्हटलं आहे की, हा भाजपाचा खरा चेहरा आहे. भाजपा बाकी जे करते ते नाटक आहे. महात्मा गांधी देशाचे राष्ट्रपिता आहेत. जगाकडून गांधी आणि त्यांच्या विचारधारेचा आदर केला जातो. गांधींचा असा अपमान आम्ही सहन करणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ऐश्वर्या चालते तेव्हा मला फार भिती वाटते' बायकोबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?

Baramati By-Election : सुनेत्रा पवार सोमवारी विधानसभेसाठी दाखल करणार उमेदवारी अर्ज , इतिहासाची होणार पुनरावृत्ती

Radhanagari Tiger sighting : राधानगरीच्या जंगलात दोन वाघांची नोंद, कॅमेऱ्यात झाले कैद; सह्याद्रीत 9 वाघांची संख्या

Pune News: पुण्यात पावसाची विश्रांती; तापमानात वाढ, पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहणार

Gold Silver Price Fall 2026 : सोने ५३ तर चांदी २ लाखांनी स्वस्त, ४ महिन्यात दरात मोठी घसरण; युद्धामुळे दर आणखी उतरणार?

SCROLL FOR NEXT