Each doctor will get a PPE kit in india 
देश

Corona Virus : प्रत्येक डॉक्टरांना मिळणार पीपीई किट

सकाळवृत्तसेवा

पुणे: कोरोना विषाणूंविरुद्ध लढणाऱया देशातील प्रत्येक डॉक्टर आणि परिचारिकांना पर्सनल प्रटोक्शन इक्विपमेंट (पीपीई) किट आणि एन 95 मास्क मिळेल या दृष्टीने केंद्राने ठोस पावले टाकली आहेत. किट आणि मास्कचे देशांतर्गत उत्पादन वाढविण्यावर भर दिला असून, परदेशातून याची मागणी करण्यात आली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात (पीपीई) किटचा तुटवडा असल्याचे वृत्त सकाळमधून सोमवारी प्रसिद्ध करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही पावले टाकली आहेत. 

जगातील पहिली घटना; अमेरिकेत कोरोनामुळे लहान बाळाचा मृत्यू

कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर आणि परिचारिकांना याचा संसर्गाचा धोका असतो. पीपीई किट आणि एन 95 प्रकारच्या मास्कमुळे रुग्णसेवा करणाऱयांना संरक्षण मिळते. पण, या किटचे देशात उत्पादन होत नाही. पण, देशातील कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नजीकच्या भविष्यात या किटची, मास्कची आणि व्हेंटीलेटरची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे याचा देशांतर्गत उत्पादनास प्रोत्साहन देण्याचे तसेच, परदेशातूनही आयत करण्याचे धोरण केंद्राने निश्चित केल्याची माहिती देण्यात आली.

जगभरातील मृतांची संख्या वाढली; युरोपमध्ये सर्वाधिक 21 हजार मृत्यू      

देशात पीपीई किटच्या उत्पादनासाठी वस्त्रोद्योग आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय संयुक्त प्रयत्न करत आहेत. देशातील 11 उत्पादक पीपीई किटच्या उत्पादनाच्या गुणवत्ता निकष चाचणी सरस ठरले आहेत. त्यांना 21 लाख पीपीई उत्पादनाचे आदेश दिले असून, विविध संस्थांच्या माध्यमातून हे किट मिळविण्यात येत आहे. तसेच, सिंगापूर येथून दहा लाख किट आयात करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रयत्नांना यश आले आहे.
मास्क उत्पादनावर भर एन 95 प्रकारचे मास्क उत्पादन करणाऱया दोन कंपन्या देशात आहेत. सध्या दररोज  50 हजार मास्कचे वितरण या कंपन्या करतात. पण, पुढील आठवड्यात ही क्षमता एक लाखांपर्यंत वाढविणार आहे. तसेच, संरक्षण दलाची संशोधन आणि विकास संघटनेतर्फे (डीआरडीओ) स्थानिक उत्पादकांच्या मदतीने एन 99 प्रकारचा मास्क उत्पादन करण्यात येणार आहे. देशातील वेगवेगळ्या रुग्णालयांमधून सध्या सुमारे 12 लाख मास्क आहेत. त्याव्यतिरिक्त आणखी पाच लाख गेल्या दोन दिवसांपासून वितरित करण्यात आले आहेत. 
रेडी रेकनरचे दर 31 मे पर्यंत जैसे थे

व्हेंटिलेटरची व्यवस्था
कोरोनाच्या संसर्गामध्ये श्वसन संस्थेची कार्यक्षमता कमी होते. अशा रुग्णांना उपचारासाठी व्हेंटीलेटर वापरावा लागतो. त्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमधील 14 हजार व्हेंटीलेटर या रुग्णांसाठी राखिव ठेवले आहेत. तसेच, भारत इलेक्ट्राँनिक्स आणि अग्वा हेल्थकेअर हे व्हेंटिलेटरचे उत्पादन करणार आहेत. त्यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीशी मुकाबला करण्यात देशातील आरोग्य यंत्रणा सज्ज होत असल्याचे चित्र दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''मी निवडून आलोय, आत जाऊ द्या!'' फरशी कारागीराला पोलिसांनी बाहेरच अडवलं; माजी उपनगराध्यक्षाचा केला पराभव

Solapur Cyber Crime : आरटीओ ई-चलानच्या नावाखाली मोबाईल हॅक; ८.४९ लाखांची ऑनलाईन फसवणूक!

Pachod Crime : वाढदिवसाला डीजे वाजवण्यावरून वाद ; दुचाकी पेटवणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले!

सोलापुरात गुन्हा दाखल! मी पत्रकार आहे म्हणून शिवभोजन केंद्रचालकांकडून दरमहा घेतला हप्ता; घराचे बांधकाम सुरु असल्याने हप्ता वाढवून मागितला अन्‌...

Karad Krushi Pradarshan : एआय तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकरी आर्थिक सक्षम होणार; कऱ्हाड कृषी प्रदर्शनात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा विश्वास!

SCROLL FOR NEXT