Earthquake 
देश

दिल्लीत 54 दिवसांत सहावा भूकंपाचा धक्का; मोठ्या भूकंपाची चाहूल?

पीटीआय

नवी दिल्ली - देशाची राजधानी दिल्लीला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला आहे. यावेळी दिल्लीच्या भूकंपाती तीव्रता 3.2 एवढी होती. विशेष म्हणजे गेल्या 54 दिवसांत दिल्ली आणि आसपासच्या भागात बसलेला हा सहावा भूकंपाचा धक्का आहे. आधीच कोरोना महामारीने भीषण परस्थिती निर्माण केली असताना या भूकंपाच्या धक्क्यांनी दिल्लीकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच भूकंपाचे छोटे धक्के म्हणजे येणाऱ्या भीषण भूकंपाची चाहूल आहे असे अनेक तज्ञांचे मत आहे. त्यामुळे दिल्लीत सध्या भीतीचे वातावरण आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दिल्लीतील भूकंपावरुन तज्ञांनी वेगवेगळी मतं व्यक्त केली आहेत. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मोलॉजीचे(एमसीएस) प्रमुख एल गौतम यांनी दिल्लीकरांनी घाबरण्याचे कारण नसल्याचं म्हटलं आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून आलेल्या भूकंपाची तीव्रता 3.5 पेक्षा कमी नोंदवण्यात आली आहे. तीव्रता 4.0 पेक्षा कमी असेल तर घाबरण्याची गरज नाही. कारण यामुळे कोणतीही हानी होत नाही. सध्या भूर्भात काही हलक्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे असं होत असल्याचं एनसीएसने म्हटलं आहे. दिल्लीच्या जवळपास कुठेही फॉल्ट फ्लेट कार्यरत नाहीत, अशी माहिती गौतम यांनी दिली आहे.

दिल्ली आणि आसपासच्या परिसरात होणारे छोटे भूकंपाचे धक्के मोठ्या भूकंपाची चाहूल आहेत, असा दावा काही अभ्यासातून करण्यात आला आहे. यूएस स्थित लॉस अलामॉस नॅशनल लॅबोरेट्रीच्या एका अहवालानुसार गेल्या वर्षी कॅलिफॉर्नियामध्ये 4.0 तीव्रतेच्या भूकंपाआधी अशाच प्रकारचे भूकंपाचे सौम्य झटके बसले होते. दक्षिण कॅलिफॉर्नियामध्ये 2008 आणि 2017 साली 4.0 पेक्षा अधिकच्या तीव्रतेचे झटके बसले होते. अशा केसेसमध्ये 72 टक्क्यांपेक्षा अधिक वेळा मोठ्या भूंकपाआधी सौम्य झटके बसत असल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे.

दिल्लीमध्ये बुधवारच्या आधी 29 मेला भूकंप आला होता. याधी रोहतक आणि हरियाणामझ्ये अनुक्रमे 4.6 आणि 2.9 तीव्रतेचे भूकंपाचे झटके बसले होते. दिल्लीत बुधवारी रात्री 10 वाजून 42 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला होता. त्यामुळे लोक घाबरुन घराच्या बाहेर पडले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT