EOLI 
देश

केंद्राकडून ‘इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स’ जारी; पुणे, मुंबई अन्‌ ठाणे ‘राहायला भारी’

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली, ता. ४ : हवामान, रोजगारांची उपलब्धता, स्वच्छता, आरोग्य सुविधा, नगरपालिकांचे कामकाज आदी बाबींमध्ये समाधानकारक दर्जा राखणाऱ्या देशातील राहण्यायोग्य शहरांच्या- २०२० च्या यादीत (इज ऑफ लिव्हिंग) माहिती-तंत्रज्ञानाची राजधानी बंगळूरने अव्वल क्रमांक पटकावला आहे. राज्यातील पुणे, नवी मुंबई, ठाणे व बृहन् मुंबई ही शहरे देखील राहाण्यासाठी भारी ठरली आहेत. दहा लाखांहून जास्त लोकसंख्या (२) व नगरपालिकांची कामगिरी (५) या दोन्ही गटांत पहिल्या पाचांमध्ये पुण्याचा समावेश झाला आहे. दहा लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या राहण्यायोग्य शहरांत हिमाचल प्रदेशाची राजधानी सिमला अव्वल ठरले आहे. सुसह्य वाहतुकीबाबत ठाणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई पहिल्या व बंगळूर तिसऱ्या स्थानी आहे.

दिल्ली तेराव्या स्थानी
केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज एका ऑनलाइन कार्यक्रमात विविध गटांतील राहण्यायोग्य शहरांचे व नगरपालिकांच्या कामगिरीचे २०२० साठीची मानांकने जाहीर केली. वीस शहरांच्या सर्वसाधारण यादीत देशाची राजधानी नवी दिल्ली तेराव्या स्थानी आहे. देशातील १११ शहरांचे सर्वेक्षण करून ही यादी तयार करण्यात आली होती. यातील ४९ शहरे १० लाखांहून जास्त लोकसंख्येची व ६२ शहरे त्यापेक्षा कमी लोकसंख्येची आहेत.

तमिळनाडूत पर्यावरण चांगले
नगरपालिकांच्या चांगल्या कामगिरीबद्दल मध्यप्रदेशातील इंदूर अव्वल स्थानी आहे. या गटातही ११४ शहरांचे सर्वेक्षण झाले होते. त्यात इंदूर, सूरत व भोपाळ यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले. कमी लोकसंख्येच्या गटात नवी दिल्ली, तिरूपती व गांधीनगर ही तीन शहरे टॉप तीनमध्ये आहेत. पर्यावरण उत्तम असलेल्या दहा राहण्यायोग्य शहरांच्या यादीत एकट्या तमिळनाडूतील सहा शहरांनी स्थान पटकावले आहे. दर्जेदार शिक्षण मिळणाऱ्या शहरांमध्ये तिरुअनंतपुरम, बेळगाव व चंडीगड, तर आरोग्य सुविधांबाबत इंफाळ, वेल्लोर व पोर्ट ब्लेअर ही तीन शहरे अव्वल ठरली आहेत.

सर्वसाधारण यादी
दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या : बंगळूर, पुणे, अहमदाबाद, चेन्नई, सूरत, नवी मुंबई, कोइमतूर, बडोदा, इंदूर व बृहन् मुंबई.
दहा लाखांपेक्षा कमी लोकसंख्या : सिमला ,भुवनेश्वर, सिल्वासा, काकीनाडा, सालेम, वेल्लूर, गांधीनगर, गुरुग्राम, दावणगिरे व तिरुचिरापल्ली.

नगरपालिकांचे कामकाज

  • दहा लाखांहून अधिक लोकसंख्या : अहमदाबाद, तिरुपूर, रायपूर, पुणे, विलासपूर, बृहन् मुंबई, उदयपूर, विशाखापट्टण, झाशी, बडोदा, तिरुनेलवेली
  • दहा लाखांहून कमी लोकसंख्या : इंदूर, नवी दिल्ली, सूरत, तिरुपती, भोपाळ, गांधीनगर, पिंपरी चिंचवड, कर्नाल, सालेम.
  • चांगली घरे : तिरुअनंतपुरम, दिल्ली, पुदुच्चेरी व भोपाळ
  • स्थैर्य : पुणे, विशाखापट्‌टण, पिंपरी चिंचवड, अहमदाबाद व ग्वाल्हेर.
  • आर्थिक क्षमता : बंगळूर, दिल्ली, पुणे, अहमदाबाद व ठाणे
  • रोजगार संधी : दिल्ली, नवी दिल्ली, बंगळूर, हैदराबाद व चेन्नई
  • पिण्याचे पाणी, साफसफाई व घनकचरा व्यवस्थापन : वेल्लोर, तिरूपती, अहमदाबाद, इंदूर, राजकोट.
  • वाहतूक : चेन्नई, ठाणे, बंगळूर, भोपाळ, गुवाहाटी
  • पुनर्निर्मिती : कोइमतूर, नवी मुंबई व गांधीनगर
  • नागरिकांची चांगली भावना असलेली शहरे : भुवनेश्वर, सिल्वासा, देवनगर, काकीनाडा, विलासपूर व भागलपूर
  • ईओएलआय इंडेक्‍स (दहा लाखांपेक्षा कमी लोकसंख्या ) : नवी
  • दिल्ली, तिरुपती व गांधीनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT