IAS Pooja Singhal News in Marathi, Delhi News Updates  
देश

IASचा प्रताप! काळा पैसा पांढरा करण्यासाठी उभारलं हॉस्पिटल; ईडीच्या चार्जशीटमध्ये दावा

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी झारखंडच्या IAS अधिकारी आणि माजी खाण सचिव पूजा सिंघल यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी झारखंडच्या IAS अधिकारी आणि माजी खाण सचिव पूजा सिंघल यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. सुमारे ५ हजार पानांच्या या आरोपपत्रात अनेक खुलासे करण्यात आले आहेत. यामध्ये काळा पैसा पांढरा कऱण्यासाठी वापरलेल्या पद्धतींचा देखील ईडीने चार्जशीटमध्ये उल्लेख केला आहे. (ed charge sheet in money laundering case against pooja singhal)

2000 च्या बॅचच्या IAS अधिकारी पूजा सिंघल यांना मनरेगा निधीची अपहार आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार प्रकरणी आधीच अटक करण्यात आलेली आहे. 44 वर्षीय पूजा सिंघल यांना झारखंड सरकारने अटक केल्यानंतर लगेचच निलंबित केले होते. त्या उद्योग सचिव म्हणून तैनात होत्या. तसेच राज्य खनिकर्म आणि भूविज्ञान विभागाच्या सचिवाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे होता. सिंघल यांच्याव्यतिरिक्त सुमन कुमारलाही अटक करण्यात आली आहे. हे दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.(IAS Pooja Singhal News in Marathi)

ईडीने 6 मे रोजी सिंघल, त्यांचे पती उद्योजक अभिषेक झा आणि रांची येथील चार्टर्ड अकाउंटंट सुमन कुमार यांच्या घरावर छापा टाकला होता. एजन्सीने दावा केला होता की सुमन कुमार यांच्या निवासस्थानातून आणि कार्यालयाच्या परिसरातून 17.79 कोटी रुपये रोख जप्त केले होते. या अटकेनंतर ईडीने अनेक राज्य सरकारी अधिकाऱ्यांचीही चौकशी केली होती.

दरम्यान आरोपी पूजा सिंघल आणि त्याच्या कुटुंबीयांच्या मालकीचे रांची येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असून या हॉस्पिटलचा उपयोग काळा पैसा पांढरा करण्यासाठी केला जात असल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले. पल्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकाम आणि व्यवस्थापनात पूजा सिंघल यांचा मोलाचा वाटा असल्याचंही ईडीकडून सांगण्यात आलं. दरम्यान पूजा सिंघलच्या सूचनेनुसार एका प्रसिद्ध बिल्डरला पल्स हॉस्पिटलची जमीन खरेदी करण्यासाठी 3 कोटी रुपये रोख दिल्याचे 'चार्टर्ड अकाउंटंटने खुलासा केल्याचा दावा ईडीने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या भावात मोठी घसरण, चांदीही स्वस्त; तुमच्या शहरातील ताजा भाव जाणून घ्या

Solapur Municipal Result:'साेलापूर जिल्ह्यात शिसेनेने रोखली भाजपची विजयी घोडदौड'; हॅट्ट्रिक पुसून भालकेंची नवी इनिंग..

एटलीच्या बिग-बजेट 'साय-फाय'मध्ये दीपिका-अल्लू अर्जुन एकत्र, 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

Viral Video: झोमॅटोचा केक पाहून महिला थक्क! वाढदिवसाच्या केकवर लिहिलं असं काही की डोक्याला हात लावला

Bribery Case : संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्याला लाच घेताना अटक; तब्बल 2.23 कोटींची रोकड जप्त, CBI ची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT