Arvind Kejriwal deliberately eating mangoes sweets enforcement directorate marathi news  
देश

Arvind Kejriwal : केजरीवाल म्हणतात, सहा किलो वजन घटलं; ईडीकडून मात्र वजन वाढल्याचा दावा, कोर्टाकडून निकाल राखीव

संतोष कानडे

नवी दिल्लीः ईडीने शनिवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाचा कालावधी वाढवण्याच्या याचिकेला विरोध केला. ईडीने कोर्टात म्हटलं की, आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत चुकीचं स्टेटमेंट दिलं आहे. जेलमध्ये असताना त्यांचं वजन एक किलोने वाढल्याचा दावा केला आहे.

अरविंद केजरीवालांनी मात्र जेलमध्ये असताना ६ किलो वजन घटल्याचं म्हटलं आहे. ईडीने विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्यासमोर दावा केला की, केजरीवालांनी तथ्य लपवून आरोग्यासंबंधी चुकीची माहिती दिली. त्यांनी मेडिकल तपास करण्याऐवजी देशभर दौरा केला.

ईडीकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यांनी कोर्टात सांगितलं की, अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिशाभूल करत दोन जूनला आत्मसमर्पण करणार असल्याचं म्हटलं.

प्रकृतीच्या कारणास्तव अंतरिम जामिनाचा कालावधी एक आठवडा वाढवण्याची मागणी अरविंद केजरीवाल यांच्यावतीने करण्यात आलेली आहे. कोर्टाने ५ जूनपर्यंत आपला निर्णय सुरक्षित ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१० संघ, ७४ सामने अन् सरावाचे नियम; IPL 2026 मध्ये नेमका काय बदल झाला?

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! पाच नवीन पोलीस स्टेशन उभारण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी; पण कोणत्या परिसरात होणार?

कोलेजनचं महत्त्व काय? वाढत्या वयात सुरकुत्या टाळण्यासाठी करा ‘हे’ उपाय!

Ravichandran Ashwin: अश्विनची मोठी भविष्यवाणी! ‘हा’ खेळाडू जिंकणार ऑरेंज कॅप; म्हणाला 'जर त्याला ओपनिंगला...'

Prioritize Fuel : आंबा-काजू बागायतदारांना प्राधान्याने पेट्रोल-डिझेल द्या; महेश सप्रे यांचे तहसीलदारांना निवेदन

SCROLL FOR NEXT