ED Action Esakal
देश

ED Action: EDची पहाटे कारवाई, केजरीवाल सरकारचे मंत्री राजकुमार आनंद यांच्या घरासह 10 ठिकाणी छापे

दिल्लीत ईडी (अंमलबजावणी संचालनालय)ने पहाटेपासून कारवाईला सुरूवात केली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आला आहे. पहाटेच्या सुमारास ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) कारवाईला सुरूवात केली आहे. आम आदमी पक्षाचे आमदार आणि मंत्री राजकुमार आनंद यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे.

ईडी राजकुमार आनंद यांच्या सिव्हिल लाईन्स येथील घरी पोहोचले असून घराची झडती घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. तर राजकुमार आनंदशी संबंधित सुमारे 10 ठिकाणी सकाळपासून ईडीचे छापे सुरू आहेत. ईडीने कोणत्या प्रकरणात कारवाई केली हे सध्यातरी समोर आलेले नाही.

दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर व्हावे लागणार आहे. अशातच आज दिल्ली सरकारचे मंत्री राजकुमार आनंद यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे.

अबकारी धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अरविंद केजरीवाल यांना आज म्हणजेच २ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, आजपर्यंत अरविंद केजरीवाल आजच्या चौकशीत सहभागी होतील की नाही हे मुख्यमंत्री कार्यालय किंवा आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आलेले नाही.

राजकुमार आनंद सध्या दिल्ली सरकारमध्ये कामगार मंत्री आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्या राजीनाम्यानंतर कामगार मंत्री राज कुमार आनंद यांना शिक्षण आणि आरोग्य मंत्रालये देण्यात आली होती. नंतर आरोग्याची जबाबदारी सौरभ भारद्वाज यांच्याकडे आणि शिक्षणाची जबाबदारी आतिशी यांच्याकडे देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT