enforcement directorate (ED) sakal
देश

ED seizes properties of Congress MLA : मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस आमदाराची कोट्यवधींची मालमत्ता ’ED’कडून जप्त!

ED action against Congress MLA : जाणून घ्या, नेमके कोण आहेत ते आमदार? ; ईडीच्या तपासात अनेक महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत.

Mayur Ratnaparkhe

ED Seizes Properties of Congress MLA Satish Krishna Sail: मनी लाँड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने(ED) मोठी कारवाई केली आहे. कर्नाटकातील काँग्रेस आमदार सतीश कृष्ण सैल आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या २१ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने जप्ती आणली आहे. ही कारवाई लोहखनिजाच्या बेकायदेशीर निर्यातीशी संबंधित आहे. तर ईडीच्या तपासात अनेक महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत.

विशेष म्हणजे तपास यंत्रणांनी यापूर्वी सतीश सैल यांच्या १५ ठिकाणी छापे टाकले होते, ज्यामध्ये ८ कोटी रुपयांची रोकड आणि सोने जप्त केले होते. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी न्यायालयाने त्यांचा वैद्यकीय जामीन रद्द केला. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये खुली जमीन, गोव्यातील मोरमुगाव परिसरातील शेतीची जमीन आणि वास्को द गामा येथील एक व्यावसायिक इमारत यांचा समावेश आहे, ज्यांचे एकूण बाजार मूल्य अंदाजे ६४ कोटी आहे.

आता ईडीच्या तपासात असे दिसून आले की श्री मल्लिकार्जुन शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड (एसएमएसएल) चे एमडी सतीश सैल यांनी २०१० मध्ये बेलेकेरी बंदरातून परवानगीशिवाय मोठ्या प्रमाणात लोहखनिज खरेदी केले आणि नंतर ते चीनला पाठवले. त्यांनी पैसे लाँड्रिंग करण्यासाठी हाँगकाँगमधील एका बनावट कंपनीचा वापर केला.

‘ED’चा ‘PFI’ला देखील दणका -

याशिवाय वेगळ्या कारवाईत, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)च्या आठ स्थावर मालमत्ता जप्त केल्या, ज्यांचे मूल्य अंदाजे ६७ कोटींपेक्षाही जास्त  आहे. या मालमत्ता विविध ट्रस्ट आणि पीएफआयच्या राजकीय शाखेच्या, सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय)च्या नावावर नोंदणीकृत असल्याचे वृत्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Boopodi Land Scam : बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे; शीतल तेजवानीचे परदेशात पलायन?

Kannad Election : उमेदवार शोधण्यासाठी राजकीय पक्षाची होतय दमछाक; कन्नडला अद्यापही युती, आघाडीसंदर्भात राजकीय पक्षांच्या हालचाली थंडच!

Latest Marathi News Live Update : पुणे व मुंबईतील जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढा - हर्षवर्धन सपकाळ

PMC Recruitment : पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्याची शक्यता

Dharashiv Elections : धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुतीत फुट स्थानिक स्वराज संस्था स्वबळावर लढण्याचे माजी आरोग्य मंत्री सावंत यांचे संकेत!

SCROLL FOR NEXT