Ramoji Rao 
देश

Ramoji Rao: शेतकऱ्याच्या लेकाने कशी उभी केली आशियातील सर्वात मोठी फिल्म सिटी? कोण होते रामोजी राव?

Who was Ramoji Rao?: राव यांचा जीवन प्रवास थक्क करणारा आणि असामान्य आहे. रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक असण्याबरोबरच त्यांनी अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- माध्यम सम्राट आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक चेरुकुरी रामोजी राव यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झालं आहे. हैदराबादमधील स्टार हॉस्पिटलमध्ये हृदयासंबंधी आजाराची लढा देत असताना त्यांची प्राण ज्योत मावळली. त्यांच्या निधनानंतर नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी आणि फिल्म इंडस्ट्रीतील अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

राव यांचा जीवन प्रवास थक्क करणारा आणि असामान्य आहे. रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक असण्याबरोबरच त्यांनी अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. रामोजी फिल्म सिटी ही आशियातील सर्वात मोठी फिल्म सिटी म्हणून ओळखली जाते. फिल्म सिटीचा परिसर २ हजार एकरमध्ये पसरलेला आहे. बाहुबली सारख्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांचं शुटिंग याठिकाणी झालं आहे. याशिवाय माध्यम क्षेत्रात त्यांनी भरिव काम केलं आहे. इनाडू वृत्तपत्र, ईटीव्ही नेटवर्कचे टेलिव्हिजन चॅनल आणि चित्रपट निर्माण कंपनी उषा-किरण मुव्हीज याची त्यांनी सुरुवात केली होती.

माध्यम क्षेत्र सोडून इतर अनेक क्षेत्रात त्यांनी आपला व्यवसाय वाढवला होता. मार्गदर्शी चीट फंड, डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स, कलनजली शॉपिंग मॉल, प्रिया पिकल्स आणि मयुरी फिल्म ड्रिस्टिब्युटर्स इंडस्ट्री या व्यवसायात त्यांनी मोठी झेप घेतली होती. तेलुगु चित्रपटसृष्टीतील चित्रपटांसाठी त्यांना चार फिल्म फेअर अवार्ड मिळाले आहेत.

राव यांच्या निधनानंतर एनटीआर ज्यूनियरने सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांच्या दूरदृष्टीचा, सिनेमा आणि माध्यम क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख केला आहे. तसेच त्यांच्या जाण्याबाबत शोक व्यक्त केला आहे. चिरंजीवीने देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तो म्हणाला की, 'उत्तुंग डोंगर जो कोणासमोरही झुकला नाही.'

Ramoji Rao

कोण होते रामोजी राव?

रामोजी राव यांचा एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्म झाला होता. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९३६ रोजी मद्रास प्रांतातील कृष्णा जिल्ह्यातील पेदापरुपुड्डी (Pedaparupudi) गावात झाला होता. त्यांचा मोठा मुलगा चेरुकुरु सुमन यांचा ७ सप्टेंबर २०१२ साली मृत्यू झाला होता. राव यांनी आपल्या आयुष्यात अनेक वरचढ पाहिले आहेत. पण, त्यांनी संकटातूनच उत्तुंग यश मिळवलं आहे.

रामोजी राव हे सुरुवातीच्या काळात काही भारतीय वस्तू तत्कालीन सोविएत रशियाला निर्यात करायचे. त्यानंतर त्यांनी चीट फंडचा व्यवसाय सुरु केला, ज्यात त्यांना मोठे यश मिळालं. प्रामाणिकपणा, चिकाटी, शिस्त आणि मोठं ध्येय ही त्यांची शिदोरी होती. त्यांनी लोणचे बॉटल, तसेच तेलुगु आणि इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले. पुरस्कार जिंकणारे कमी बजेडचे अनेक चित्रपट त्यांनी तयार केले. तेलुगु देसम पार्टीच्या उगम आणि वाढीमध्ये त्यांचा मोठा हात होता. वयाचे ५० वर्षे होण्याआधीच त्यांची शक्ती अमर्याद वाढली होती. शेवटच्या श्वासापर्यंत ते उद्यमशील तरुणांना मार्गदर्शन आणि नवनवीन कल्पना देत राहिले.

साधारणपणा हा रामोजी राव यांचा स्वभावगुण होता. लगेच लोकांना ते आपलसं करायचे. ते कम्मा जातीचे होते. आंध्र प्रदेशातील कृष्णा खोऱ्यातील जमीनदार वर्गामध्ये या जातीचा समावेश होतो. त्यांनी १९६२ मध्ये मार्गदर्शी चीट फंड सुरू केला. चीट फंड काय असतं हे अनेकांना माहिती नसल्याच्या काळात त्यांनी ते सुरू केलं आणि आज त्याचा टर्न ओव्हर १० हजार कोटी आहे. पुढे त्यांचीच कल्पना सहाराचे प्रमुख सुब्रत रॉय यांनी अमलात आणली होती.

मार्गदर्शी चीट फंडमधील पैसे आणि पत्नीच्या पाठिंब्यामुळे त्यांनी व्यवसायाच्या अनेक कल्पना सत्यात उतरवल्या. इनाडू म्हणजे 'आज' या वृत्तपत्राची स्थापना त्यांनी १९७४ मध्ये केली. इनाडू वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी आंध्रामध्ये वृत्तपत्र क्षेत्रात क्रांती केली. या वृत्तपत्रामध्ये स्थानिक बातम्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असायचा. तोपर्यंत कोणतेच वृत्तपत्र इतक्या छोट्या लेव्हलच्या बातम्या कव्हर करत नव्हतं. त्यांनी माध्यमातील डिजिटलायझेशनची गती ओळखून त्याप्रमाणे पाऊलं उचलली होती.

राव यांनी अनेक नवे उपक्रम सुरू करून तेलुगु मीडियाला नवी दिशा दिली. त्यांच्याच नेतृत्त्वात इनाडू या वृत्तपत्राने पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठे नाव कमावले. यासोबत उषा-किरण मुव्हीज, मयुरी फिल्म डिस्ट्रिब्युटर्स, मार्गदर्शी चीट फंड, डॉल्फिन ग्रुप ऑप हॉटेल्स यामध्ये देखील त्यांनी व्यवसायात वाढ केली होती. राव यांना २०१६ मध्ये पद्मविभूषण मिळाला होता. त्यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा भारतातील दुसरा सर्वात मोठा सन्मान देण्यात आला होता. साहित्य, पत्रकारिता आणि शिक्षण या क्षेत्रातील कामासाठी त्यांचा सन्मान करण्यात आला होता. त्यांचा जीवन प्रवास पाहता त्यांनी विविध क्षेत्रात केलेलं काम पाहून आश्चर्य वाटतं. त्यांचं आयुष्य अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaghcha Raja Look: लालबागचा राजा २०२५ चा पहिला लूक समोर, प्रथम दर्शनातून दिसली पहिली झलक, पाहा व्हिडिओ

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Nagpur Fraud;'बेटिंग ॲप’द्वारे किराणा व्यापाऱ्याची २६ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT