Covaxin
Covaxin  
देश

'Covaxin'च्या जागतीक मान्यतेसाठी धडपड; WHOला कागदपत्रं सुपूर्द

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : कोव्हॅक्सिन लशीची (covaxin vaccine) निर्माता कंपनी भारत बायोटेक (Bharat Biotech) फार्माकडून लशीच्या जागतीक मंजुरीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. कोव्हॅक्सिन लशीच्या आपत्कालीन वापरासाठीच्या लशींच्या यादीत समावेश व्हावा यासाठी जागतीक आरोग्य संघटनेकडे (WHO) ९० टक्के कागदपत्रे सुपूर्द केली आहे. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Efforts for global recognition for covaxin begins 90 percent documents submitted to WHO)

भारत बायोटेककडून इतर १० टक्के कादगपत्रं जून महिन्यात WHO कडे सुपूर्द करण्यात येणार आहेत, अशी माहिती कंपनीने केंद्र सरकारला दिली. दरम्यान, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर WHO कडून कोव्हॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठींच्या लशींच्या यादीत समाविष्ट करुन घेण्यात येईल, असा विश्वास कंपनीनं व्यक्त केला आहे.

कोव्हॅक्सिनला ११ देशांनी दिली मंजुरी

दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार कोव्हॅक्सिनला ११ देशांनी वापरासाठी मंजुरी दिली आहे. तर सात देशांमधील ११ फार्मा कंपन्यांनी भारत बायोटेककडे लसीच तत्रज्ञान हस्तांतरीत करण्यास आणि उत्पादन सुरु करण्यात रस दाखवला आहे.

अमेरिकेसोबत तडजोडीच्या शेवटच्या टप्प्यात

पीटीआयच्या वृत्तानुसार, भारत बायोटेक कोव्हॅक्सिन लशीच्या अमेरिकेतील वापरासाठी तिथल्या अन्न आणि औषध प्रशासनासोबत तडजोडीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्यासाठी अमेरिकेत या लशीची छोट्या स्वरुपातील तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल पार पडणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT