Eknath Shinde sakal
देश

Eknath Shinde meet Modi-Shah: दिल्लीत मोदी-शहांशी नेमकी काय चर्चा झाली?, एकनाथ शिंदेंनी मीडियाला सविस्तरच दिलं उत्तर, म्हणाले...

Eknath Shinde Tuant on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरही टोला लगावला, जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले आहेत?

Mayur Ratnaparkhe

Eknath Shinde reveals key discussion with Modi-Shah in Delhi: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्लीत आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे देखील दिल्लीत दाखल झाले असून, ते इंडिया आघाडीच्या बैठकीत हजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर एकनाथ शिंदे यांनी मोदी आणि शहांची भेट घेवून नेमकी काय चर्चा केली, यावरून तर्कवितर्क लावले जात होते. दरम्यान, आता खुद्द एकनाथ शिंदे यांनीच या भेटीमागचं नेमकं कारण सांगत, नेमकी काय चर्चा झाली याबाबत मीडियाला संपूर्ण माहिती दिली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, ''मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. अमित शहा यांना आम्ही सर्व खासदारांसोबत भेटलो आणि त्यांना आतापर्यंतच्या भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ गृहमंत्री पदावर राहिल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केलं. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र यांची कुटुंबासह भेट घेतली.''

याचबरोबर ''ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव यासाठी देखील त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान पदावर त्यांना अकरा वर्षे पूर्ण झाली आणि एनडीएला देखील जवळपास २५ वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे आम्ही त्यांना आज शुभेच्छा दिल्या आहेत. एनडीएचा शिवसेना हा चौथ्या क्रमांकाचा मित्र आहे. त्यामुळे या सर्व भेटीमध्ये अभिनंदन, शुभेच्छा तर दिल्याच, पण अकरा वर्षांत त्यांनी केलेलं काम हे अभिनास्पद आहे. प्रत्येक भारतीयला अभिमान वाटावा असं काम पंतप्रधान मोदींनी केलंय. याशिवाय ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातूनही पाकिस्तानाला जशासतसं उत्तर देण्याची हिंमत त्यांनी दाखवली.'' असं एकनाथ शिंदेंनी बोलून दाखवलं.

तर ''शिवसेना हा एनडीएचा चौथ्या क्रमांकाचा मित्र पक्ष आहे. भाजप आणि शिवसेनेचं नातं फार जुनं आहे. शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ही युती घडवली आहे. त्यामुळे उपराष्ट्रपती पदासाठी भाजप, एनडीए जो निर्णय घेतील, त्याला आमचं पूर्ण समर्थन आहे.'' असंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं.

अमित शहांसोबत बंद दारआड नेमकी काय चर्चा झाली? -

याप्रश्नावर बोलताना शिंदे म्हणाले, ''आमचं काहीही बंददाराआड नसतं, सगळं उघडं आहे. आम्ही खासदारांसोबत गेलो, खासदारांचे काही विषय होते, ते त्यांच्यासमोर मांडले. अमित शहा यांची कार्यपद्धती सर्वांना माहीत आहे, ते तत्काळ निर्णय घेतात. त्यामुळे त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील काही विषयांवर चर्चा झाली. निवडणुकांच्या विषयावर चर्चा झाली आणि एक अतिशय चांगली चर्चा झाली.''

उद्धव ठाकरेंना लगावला टोला-

उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झाले असून इंडिया आघाडीच्या बैठकीस हजर राहणार असल्याची माहिती समोर आली. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, ''ते तिकडे दहा जनपथकडे जाताय, आम्ही इकडे लोककल्याणकारी मार्गावर जातोय. प्रधानमत्री लोककल्याण मार्ग तिकडे आम्ही गेलो, हा फरक आहे. बाळासाहेबांनी जो लोककल्याणाचा मार्ग आम्हाला दाखवलाय, त्या मार्गाने आपण गेलो आहोत आणि देश बघतोय, की कोण कुठं चाललय? जे बाळासाहेबांनाही आवडलं नाही, ते जे काही लोक करताय आणि जे बाळासाहेबांना आवडत होतं, बाळासाहेबाचे विचार हे आम्ही पुढे घेवून जात आहोत. हे मला सांगण्याची गरज नाही. आमचा शिवसेना पक्ष आहे आणि त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. आमचा पक्ष हा लोककल्याणाचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथे कोणी मालक नाही आणि कोणी नोकर नाही.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Land Scam: सरकारी जमिनीवर माफियांचा डोळा! पुण्यात कृषी विभागाच्या जमिनीचा मोठा अपहार; अधिकारीही अडचणीत

Latest Marathi News Live Update : मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी मंगळवारी होणार निर्णय

बाथरुमचा पाइप डायरेक्ट समुद्रात... वनिताच्या घरात घुसलेलं २६जुलैच्या पुराचं पाणी; म्हणाली, 'शाळेत जायला निघालेलो आणि...

Eknath Shinde Vs BJP : कोकणात एकनाथ शिंदे स्वबळावर लढणार, दीपक केसरकरांनी भाजपला इशारा देत विजयाचं गणित सांगितलं...

Malkapur Accident : 'ट्रकच्या धडकेत तिघे गंभीर जखमी'; मलकापूरनजीक अपघात, दोन महामार्ग कर्मचाऱ्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT