Viral Video
Viral Video 
देश

Viral Video : आजोबा-आजींचे प्रेम पाहून लोक भावूक; असे प्रेम निभवायचे असते..

सकाळ डिजिटल टीम

प्रेम हे असं नातं आहे, ज्याचा रंग तारुण्यापासून वयाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तसाच राहतो. प्रेम खरं असेल तर ते फक्त काही काळासाठी टिकत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती आजारी असते किंवा अंथरुणाला खेळलेली असते अशा व्यक्तीची हाडे कमकुवत झालेली असतात. या क्षणापर्यंत आपली काळजी घेणारे कुणी असेल आणि त्याला समोरच्या व्यक्तीची काळजी असेल तर समजून की, या व्यक्तीच्या जीवनात प्रेमाला प्रचंड किंमत आहे. प्रेम हीच त्याची खरी संपत्ती आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओतून असेच एका वृद्ध जोडप्याचे प्रेम पाहायला मिळाले आहे. हा व्हायरल व्हिडिओ एका वृद्ध जोडप्याचा आहे. इतके वर्ष या दोघांना एकत्र पाहिल्याने अनेकांना आनंददायी अनुभव मिळाला आहे. या जोडप्याचा हा व्हिडिओ एका आयएएस ऑफिसरने त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. त्याने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जर कोणी विचारले की प्रेम काय असते, तर मी सांगने की, की प्रेमाला वय नसते. ते कोणत्याही वयात अगदी चिर:तरुण राहते.

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक वृद्ध जोडपे जमिनीवर बसून एकमेकांसोबत जेवण करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये वृद्ध महिला आपल्या पतीला हाताने जेवण भरवताना दिसत आहे. इतक्या वृद्ध वयात त्यांना अशा परिस्थितीत पाहून लोक भावूक झाले आहेत. नेटकऱ्यांच्या कमेंट्स आणि लाईकमुळे हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या पार्श्वभूमीतील 'एक प्यार का नगमा' हे गाणे त्याचे प्रेम वाढवत आहे.

या व्हिडिओला आतापर्यंत 6 लाख 20 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच लोक व्हिडिओवर कमेंट करत आहेत आणि या जोडप्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिले की, 'अप्रतिम दृश्य पण खरे प्रेम हेच असते. आम्हाला एकमेकांची सर्वात जास्त गरज आहे, हे यातून दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid subvariant: चिंता वाढली! राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे 'इतके' रुग्ण आढळले, पुण्यात 51 तर ठाण्यात 20

Team India Racism : भारतीय क्रिकेट संघात होतोय वंशभेद..? वर्ल्डकप विजेत्या संघातील माजी खेळाडूचा धक्कादायक खुलासा

Health Tips : मधुमेहावर करायचीय मात तर हे पदार्थ असायलाच हवेत आहारात, लवकर फरक जाणवेल!

गोफण | भटकती आत्मा.. ऑफर नव्हे सल्ला! प्रकरण कोर्टात

Latest Marathi News Live Update : पॅरामोटरिंग करताना तरुणीचा अपघात

SCROLL FOR NEXT