elderly woman beaten from man at ghaziabad cctv video viral 
देश

Video: वृद्ध महिलेला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण

वृत्तसंस्था

गाझियाबाद (उत्तर प्रदेश) : एका रस्त्यामध्ये वृद्ध महिलेला बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एक जण महिलेची छेड काढत होता, त्याला वृद्ध महिलेने विरोध केला म्हणून मारहाण केल्याची घटना घडल्याचे स्थानिकांनी सांगितले.

वृद्ध महिलेचा मुलगा सुशांत चौधरी यांनी सांगितले की, आमच्या परिसरात राहात असलेली व्यक्ती मुली आणि महिलांची छेड काढून दहशत निर्माण करत होता. आमच्या कॉलनीमधून एक महिला जात होती. त्यावेळी त्याने छेड काढली. आईने त्याला विरोध केल्यानंतर त्याने मारहाण करण्यास सुरवात केली. बेशुद्ध होईपर्यंत हातात मिळेल त्या वस्तूने त्याने मारहाण केली. लोखंडी खुर्चीही उचलून डोक्यात घातली. आई बेशुद्ध पडल्यानंतर रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने क्रौर्याची परिसीमा गाठल्याचे पाहायला मिळते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dehradun Sahastradhara Cloudburst : सहस्रधारात पावसाचा हाहाकार, दुकाने गेली वाहून; अनेक जण बेपत्ता

Gemini AI Saree Trend Alert: जेमिनी नॅनो बनाना AI साडीचा ट्रेंड फॉलो करताना व्हा अलर्ट, व्हिडिओ शेअर करत महिलेने समोर आणला धक्कादायक प्रकार

Stock Market Opening: वीकली एक्सपायरीच्या दिवशी बाजाराची सुस्त सुरुवात; सेंसेक्स 70 अंकांनी वर, कोणते शेअर्स वाढले?

Latest Marathi News Updates : विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

ब्रेक अप के बाद! हार्दिक पांड्याच्या आयुष्यात नवीन अभिनेत्री; Jasmin Walia सह नातं संपलं? Mahieka Sharma ची आयुष्यात एन्ट्री

SCROLL FOR NEXT