Karnataka cabinet minister Munirathna esakal
देश

Election Commission : 'या' समाजाविरुध्द भडकाऊ भाषण; निवडणूक आयोगाची कॅबिनेट मंत्र्यावर मोठी कारवाई

मुनीरत्ना यांनी ख्रिश्चन समुदायाविरोधात भडकाऊ भाषण केलं होतं, त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Balkrishna Madhale

निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

कर्नाटकच्या कॅबिनेट मंत्र्यावर मोठी कारवाई करत निवडणूक आयोगानं (Election Commission) त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केलाय.

एका टीव्ही मुलाखतीदरम्यान कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री मुनीरत्ना (Munirathna) यांनी अल्पसंख्याकांबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं, ते द्वेषयुक्त भाषण म्हणून लक्षात घेऊन निवडणूक आयोगानं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

राजाराजेश्वरी नगर पोलिस ठाण्यात मुनीरत्नांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुनीरत्ना यांनी ख्रिश्चन समुदायाविरोधात भडकाऊ भाषण केलं होतं, त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मुनीरत्ना हे सध्याच्या बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत.

पुढील महिन्यात 10 मे रोजी कर्नाटकमध्ये निवडणुका (Karnataka Election) होणार आहेत. राज्यातील सर्व 224 विधानसभा जागांवर एकाच वेळी मतदान होणार आहे. तर, 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोग नेत्यांची वक्तव्ये आणि त्यांच्या प्रचारावर बारीक लक्ष ठेवून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT