Election Commission Esakal
देश

Election Commission: 'आप'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा, तृणमूल अन् राष्ट्रवादीला झटका

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला! राष्ट्रवादी कायदेशीर पाऊल उचलणार

अंकिता खाणे (Ankita Khane)

आज आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. याशिवाय शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. यासह, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जाही काढून घेण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने याबाबतची माहिती दिली आहे.

खरं तर, 2016 मध्ये, निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी नियम बदलले आहेत. आता हा आढावा पाच ऐवजी 10 वर्षात घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, कोणत्याही राष्ट्रीय पक्षासाठी देशातील किमान चार राज्यांमध्ये त्यांच्या उमेदवारांना सहा टक्क्यांहून अधिक मते मिळणे आवश्यक आहे. लोकसभेत किमान चार खासदारांनी त्याचे प्रतिनिधित्व केले पाहिजे.

आयोगाला २०१९ मध्येच टीएमसी, सीपीआय आणि एनसीपी या राष्ट्रीय पक्षाचा आढावा घ्यायचा होता, परंतु त्यानंतर आगामी राज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाने पुनरावलोकन केले नाही. निवडणूक चिन्ह आदेश 1968 अंतर्गत पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यामुळे, पक्ष देशातील सर्व राज्यांमध्ये एकाच चिन्हावर निवडणूक लढवू शकत नाही.

आता देशात किती राष्ट्रीय पक्ष आहेत?

1. भारतीय जनता पक्ष (भाजप)

2. काँग्रेस

3. बहुजन समाज पक्ष (BSC)

4. भारतीय कम्युनिस्ट पक्ष

5. नॅशनल पीपल्स पार्टी (NPP)

6. आम आदमी पार्टी (आप). AAP हा भारतातील सर्वात नवीन राष्ट्रीय पक्ष आहे. या पक्षाला 2023 साली म्हणजेच आजच राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Kolhapur Crime : शेतात कामासाठी गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग, शरीरसुखास नकार दिल्याने निर्घृण खून; खिशावरील 'त्या' डागाने उलगडलं धक्कादायक रहस्य

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

SCROLL FOR NEXT