देश

Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये सैन्याची दहशतवाद्यांशी चकमक; तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरमधील सिधरा येथे सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक

सकाळ डिजिटल टीम

जम्मू-काश्मीरमधील सिधरा येथे सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक झाली, ज्यामध्ये तीन दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातले आहे. सिधरा भागातून दहशतवादी निघून गेल्याची माहिती जवानांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलाच्या पथकाने एक टीम तयार करून दहशतवाद्यांना घेराव घातला.

दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले असता त्यांनी गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. यामध्ये तीन दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातले आहे.

हे दहशतवादी ट्रकमधून नगरोटा येथे जात असताना सुरक्षा दलांनी त्यांना सिधरा पुलाजवळ अडवले. काही दिवसांपूर्वी याच परिसरात ग्रेनेड हल्लाही झाला होता. चकमकीमुळे सिधरा मार्गावर वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

आम्हाला एका ट्रकची असामान्य हालचाल दिसली आणि आम्ही त्याचा पाठलाग केला. जम्मूमधील सिध्रा येथे ट्रक थांबवण्यात आला आणि चालक पळून जाण्यात यशस्वी झाला. ट्रकचा शोध घेतला असता आत लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल गोळीबार करण्यात आला: एडीजीपी मुकेश सिंह यांनी ही माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT