Engineering Process: आज सायंकाळी पाच वाजता एमएचटी सीईटीचा निकाल जाहीर होणार असून या निकालानंतर लगेच अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात होईल. तुम्हालाही जर का इंजिनीयरींग करायचं असेल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्वाची ठरेल. आज आहे इंजिनीयरींग डे. यानिमित्तानं जाणून घ्या इंजिनीयरींगसाठीची प्रोसेस.
Engineering क्षेत्रात प्रवेश कसा घ्यायचा ?
तुम्ही जर का इंजिनीयरींगच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेऊ इच्छित असाल तर त्यासाठी तुम्हाला आधी यासाठी पात्र असणे आवश्यक आहे. पात्रतेसाठी तुम्ही १२वी पास असणं अनिवार्य आहे. १२वी मध्ये Physics आणि Maths उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. यामध्ये ४५ टक्के आरक्षण हे अपंग विद्यार्थ्यांसाठी असते. यासोबतच तुम्हाला पात्रता परीक्षाही द्यावी लागते.
MHT-CET: महाराष्ट्रातील महाविद्यालयांसाठी तर
JEE-MAIN central level: देशभऱ्यातील महाविद्यालयांत प्रवेश घेऊ पाहाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
या प्रवेश परीक्षा दिल्याशिवाय तुम्हाला अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेश मिळू शकत नाही.
प्रवेशासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे
१. SSC (१० वी) मार्कशीट
२. HSC (१२ वी) मार्कशीट
३. MHT-CET/JEE-MAIN Score Card
४. HSC TC
५. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट (Nationality Certificate)
६. डोमेसाईल सर्टिफिकेट (Domecile)
७. कास्ट सर्टिफिकेट (Cast Certificate)
८. नॉन क्रिमीलेयर सर्टिफिकेट
९. इनकम सर्टिफिकेट
१०. कास्ट वॅलिडीटी सर्टिफिकेट
११. आधार कार्ड
१२. पासपोर्ट साईज फोटो
१३. स्कॅन करण्यासाठी सही
जर तुमच्या कडे ही कागदपत्रे नसतील तर त्वरीत ती बनवुन घ्या. कागदपत्रे बनण्यास वेळ असेल तर तात्पुरती मिळालेली त्याची स्लिप दाखवूनही तुम्ही प्रवेश घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.