engineers day desi jugaad video viral anand mahindra on twitter 
देश

Engineers Day: देशी जुगाडाचे व्हिडिओ केले व्हायरल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: सोशल मीडियावर देशी जुगाडाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अभियंता दिवसाच्या (Engineers Day) च्या निमित्ताने उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून काही देशी जुगाडचे व्हिडिओ व्हायरल केले आहेत.

भारतातील पहिले अभियंते भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ 15 सप्टेंबर हा दिवस भारतात अभियंता दिवस म्हणून साजरा केला जातो. देशातील सर्वात नामवंत असे अभियंता, धरणांचे निर्माता, राजकारणी अर्थतज्ज्ञांपैकी ते एक होते. म्हैसूरमधील राजा सागर धरणाचे बांधकाम आणि पूर संरक्षण यंत्रणा यासाठी त्यांना 1955 मध्ये भारतरत्नाने सन्मानित करण्यात आले होते. अभियांत्रिकी म्हणजे खूपच कठीण आहे, असे समजले जाते. पण, अनेकजण अभियांत्रिकीचे शिक्षण न घेताही बुद्धिमता आणि कौशल्याच्या आधारे देशी जुगाड शोधून काढताना दिसतात. अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आनंद महिंद्रा काही व्हिडिओ शेअर केले आहेत.

दुचाकीचा वापर करून मक्याच्या कणसांपासून मक्याची दाणे वेगळी केली जातात, असे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. शेतकऱ्यांच्या कल्पकदृष्टीचे हे उदाहरण आहे, असे आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका व्हिडिओत एका दारूच्या दुकानातील वितरण व्यवस्था दाखवण्यात आली आहे. यात दुकानाच्या खिडकीतून एक लांब पाईप लावण्यात आला आहे. ज्याद्वारे ग्राहकांना एक प्लॅस्टिकची कापलेली बाटली सोडली जाते त्यात पैसे ठेवल्यानंतर ही बाटली परत ओढली जाते आणि त्यानुसार मग दारूची बाटली पाठविली जाते.

या व्हिडिओत एक दरवाजा बंद करण्यासाठी एका पाण्याने भरलेल्या बाटलीचा वापर करण्यात आला आहे. ही बाटली दरवाजावर टांगण्यात आली आहे. दरवाजा उघडल्यानंतर बाटलीच्या वजनाने तो आपोआप बंद होत असल्याचे पाहायला मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT