Grandma From Kashmir Esakal
देश

काश्मीरी आज्जींची बातच न्यारी, इंग्रजीचे कौशल्य पाहून व्हाल थक्क

आज्जीं करते चक्क काश्मीरी भाषेचे ट्रान्सलेशन

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर सध्या एका वृद्ध महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तिच्या ३० सेकंदाचा व्हिडिओ पाहून तुम्हाला ही तिचे कौतुक वाटेल. यात तिने चक्क तिचे इंग्रजी (English)कौशल्य दाखवले आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की हि वृद्ध महिला परदेशातील नसून ती आपल्या भारतातील काश्मीर खोऱ्यातील (Kashmir)आहे. हा व्हिडिओ सय्यद एस शाह यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. (English-Speaking Grandma From Kashmir)

यामध्ये तिच्या सोबत एक तरूण आहे. कदाचित तिचा नातू असावा. व्हिडिओ जेव्हा सुरु होतो तेव्हा तो तरूण काश्मीरी भाषेत बोलण्यास सुरुवात करतो. तेव्हा पारंपारिक पोशाखात असलेली इंग्रजी बोलणारी काश्मिरी दादी पटापट बोलायला सुरुवात करते. सुरुवातीला ती थोडे अडखळते पण नंतर ती काश्मीरी भाषेचे ट्रान्सलेशन इंग्रजी भाषेत करते.

अगदी सुरुवातीलाच ती 'मांजर' (Cat) ओळखताना अडखळते, पण नंतर ती त्याला 'क्यात' म्हणून ओळखते. कांदा, सफरचंद, लसूण आणि कुत्रा (Onion,Apple,Garlic,Dog) या शब्दाचा उच्चार ती सुरळीत करते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महिलेचे ठिकाण माहित नसले तरी व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीच्या आवाजावरून ती काश्मीरी खोऱ्यातील ग्रामीण जिल्ह्यातील असल्याचे लक्षात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फसव्या जाहिराती, निकृष्ट दर्जा! सौंदर्यप्रसाधनांवर FDAची कारवाई; गैरप्रकार सहन केला जाणार नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गकरांनो, आणखी वाट पाहावी लागणार! मॉन्सून पूर्णपणे मंदावला; पाहा पुढील 4 दिवसांचा अंदाज, शेतीची कामे रखडली

Fifa World Cup 2026 : जपानी फॅन्स मॅचनंतर स्टेडियममधील कचरा का उचलतात? त्या तरूणीनं 'Meiwaku' बद्दल सांगितलं, जाणून घ्या काय आहे ते?

Nagpur: पाण्याचे शिंतोडे उडाल्याच्या वादातून खून;कळमन्यातील घटना; दोन कुटुंबातील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Satara Sangli Election: सातारा-सांगली निवडणुकीत मोठा सस्पेन्स! राष्ट्रवादीची नाराजी उघड, भाजपला मित्रपक्षांची साथ मिळणार का?

SCROLL FOR NEXT