Mask-Sanitiser
Mask-Sanitiser 
देश

जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये या वस्तू नाहीच

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - कोरोना संसर्गाच्या काळात प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनलेल्या मास्क व सॅनिटायजर यांना जीवनावश्‍यक वस्तूंच्या यादीतून वगळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देशातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असताना याबाबतच्या आधीच्या निर्णयाला मुदतवाढ देण्याचे सरकारने नाकारल्याने हा निर्णय वादात सापडण्याची चिन्हे आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाशी लढण्यासाठीची शस्त्रे मानल्या गेलेल्या या दोन्ही गोष्टी जीवनावश्‍यक वस्तूंच्या यादीमधून वगळल्याने त्यांची साठेबाजी व काळाबाजार पुन्हा सुरू होईल, या शंकेस भाजप सूत्रांनीही दुजोरा दिला.  लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क-सॅनिटायजर वापरण्याबाबत स्वतः पंतप्रधानांपासून सर्वांनीच आग्रह धरला होता. अर्थात त्याच्या केवळ ६ दिवस आधी (१८ मार्च) मास्क घालून सभागृहात आलेल्या खासदारांना संसदेच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी "मास्क घालून तुम्हाला सभागृहात बसता येणार नाही. ते तत्काळ हटवा'' असे आदेश दिले होते.

पंतप्रधानांनी, घरगुती मास्क बनवून वापरा असे आवाहन केल्यानंतर भाजपसह अनेक स्वयंसेवी संस्थांनी देशभरात कोट्यवधी मास्कचे वाटप केले. काळाबाजार,  निकृष्ट दर्जाच्या मास्क, सॅनिटायजरची निर्मिती आणि विक्री रोखण्यासाठी सार्वजनिक पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी या दोन्ही गोष्टी ३० जूनपर्यंत जीवनावश्‍यक वस्तूंच्या यादीत सामील करण्याची घोषणा केली होती.

यासाठी आवश्‍यक वस्तू अधिनियम-१९५५ मध्ये दुरुस्ती करण्याचा वटहुकूमही सरकारने आणला होता. २ व ३ प्रकारचे प्लाय सर्जिकल फेस मास्क, एन- ९५ मास्क व हॅंड सॅनिटाइजर यांचा त्यात समावेश केला गेला. मात्र तेव्हापेक्षा आता कोरोनाचा प्रकोप वाढलेला असताना सरकारने त्या निर्णयाला मुदतवाढ न देता काल त्या यादीतून दोन्ही गोष्टी कमी केल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. यामुळे दुकानदार आता पुन्हा या दोन्ही गोष्टी मनमानी भावाने विकू लागतील अशी भीतीही व्यक्त होते आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT