Ethanol Project sakal
देश

Ethanol Production: इथेनॉल निर्मितीवरील बंदी उठवली; सरकारच्या निर्णयामुळं साखर कारखान्यांना मोठा दिलासा

केंद्रीय अन्न व प्रशासन मंत्रालयातील एका अधिकाऱ्यानं याबाबत माहिती दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : साखरेच्या उत्पादनात घट होणार असल्यानं तसेच त्यामुळं साखरेच्या दरातही वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारनं बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती. पण आता केंद्रानं ही बंदी उठवली आहे, त्यामुळं साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय अन्न व प्रशासन मंत्रालयातील एका अधिकाऱ्यानं याबाबत माहिती दिली आहे. (ethanol production ban lifted by government it's big relief to the sugar mills)

केंद्रीय अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, चालू वर्षात इथेनॉलच्या निर्मितीसाठी ६.७ लाख टन बी हेवी मोलॅसिस वारण्याची परवानगी दिली आहे. २४ एप्रिल रोजी या निर्णयाला परवानगी देण्यात आली. यामध्ये ३१ मार्च २०२४ अखेरपर्यंत बी हेवी मळीच्या मात्रेतून इथेनॉल खरेदी करण्याचे आदेश केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे पारित होणार आहे, याच्या प्रक्रियेला सुरुवातही झाली आहे. (Latest Marathi News)

या इथेनॉल निर्मितीसाठी सुमारे ३.२५ लाख टन अतिरिक्त साखर इथेनॉल निर्मिकडं वळवली गेल्यानं त्यातून ३८ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती होण्याचा अंदाज आहे. यातून २ हजार ३०० कोटी रुपये उपलब्ध होतील. तर त्यामुळं साखरेचे साठे कमी होऊन स्थानिक साखरेचे विक्री दर सुधारण्यास मदत होणार आहे. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, देशातील साखर कारखान्यांच्या प्रकल्पांमध्ये शिल्लक राहिलेल्या सुमारे सात लाख टन बी हेवी मळीचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी करण्याची विनंती पत्राद्वारे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय सरकार मंत्री अमित शहा यांनी २४ फेब्रुवारी रोजी दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Almatti Dam Water Storage : कोल्हापूर सांगलीला धडकी भरवणाऱ्या अलमट्टी, हिप्परगी धरणातील पाणीसाठा किती?; तज्ज्ञांनी दिली माहिती

Gadchiroli: आलापल्ली-सिरोंचा महामार्ग जड वाहतुकीस बंद!; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत येथून चालणार नाहीत अवजड वाहने

लॉर्ड्सच्या बाल्कनीतील तो ऐतिहासिक क्षण पुन्हा जिवंत; सौरव गांगुलीच्या भूमिकेत राजकुमार रावचा दमदार लूक

Kolhapur Flood News : पंचगंगा इशारा पातळीपासून अडीच फूट दूर, राधानगरी धरण परिसरात अतिवृष्टी; जिल्ह्यातील धरणात इतका पाणीसाठा

Latest Marathi News Live Update : मुळशी तालुक्यातील भुकूम परिसरात मुसळधार पावसामुळे सोसायटीची कंपाऊंड भिंत अचानक कोसळली

SCROLL FOR NEXT