देश

मला काँग्रेस अध्यक्ष बनवा; माजी मंत्र्यांची पत्र लिहून मागणी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: माजी केंद्रिय मंत्री असलम शेर खान यांनी आपल्याला दोन वर्षे काँग्रेस अध्यक्ष बनवावे असा प्रस्ताव दिला आहे. असलम खान यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा मी त्यांना एक पत्र लिहले होते. या पत्रात लिहले होते की, काँग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी नेहरू-गांधी घराण्याव्यतिरिक्त व्यक्तीकडे द्यायला हवी. 

राहुल गांधी अध्यक्षपदावर कायम राहणार असतील तर, ते अध्यक्षपद समर्थपणे सांभाळू शकतात. पण, त्यांची इच्छा नसेल तर या पदाची जबाबदारी दोन वर्षासाठी आपल्यावर द्यावी अशी मागणी पत्रातून केली असल्याचे असलम यांनी सांगितले आहे.

दरम्यान, असलम यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाला राहुल गांधी यांना जबाबदार धरण्यास नकार दिला आहे. असलम म्हणाले की, राहुल गांधी यांनी पूर्ण प्रयत्न केले होते. पण, लोक काही कारणांमुळे लोक काँग्रेसला स्वीकारायला तयार नाहीत. परंतु काँग्रेसमध्ये बदल करणे गरजेचे असून अध्यक्षपदासाठी माझ्यापेक्षा चांगली व्यक्ती असल्यास त्या व्यक्तीवरही काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते असेही असलम यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT