Rajiv Gandhi Lakshadweep Trip Sakal
देश

PM in Lakshadweep: राजीव गांधी कुटुंबियांसोबत गेले होते लक्षद्वीपमध्ये, PM मोदींनी 2019 मध्ये केली होती टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लक्षद्वीप दौरा चांगलाच गाजत आहे. त्यातच आता तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांचा ३८ वर्षांपूर्वी लक्षद्वीपचा दौरा चर्चेत आला आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लक्षद्वीप दौरा चांगलाच गाजत आहे. त्यातच आता तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचा ३८ वर्षांपूर्वी केलेला लक्षद्वीपचा दौरा चर्चेत आला आहे. १९८७ मध्ये प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी कुटुंबीय आणि इतर नातवाईकांसोबत लक्षद्वीपमध्ये १० दिवस सुट्टी उपभोगली होती. यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये निवडणुकीदरम्यान काँग्रेसवर हल्लाबोल केला होता.

पंतप्रधान मोदी यांनी २ जानेवारीला लक्षद्वीप दौरा केला होता. येथील निसर्गाचा आनंद घेत असताना त्यांनी काही फोटो एक्सवर पोस्ट केले होते. पर्यटनासाठी लक्षद्वीपमध्ये नक्की या असं आवाहन त्यांनी लोकांना केलं होतं. एक दिवस लक्षद्वीपमध्ये राहून मोदी केरळमध्ये परत आले होते. (ex pm Rajiv Gandhi went with his family to Lakshadweep criticized by Prime Minister Modi in 2019 Maldives)

२०२४ मधील पंतप्रधान मोदी यांच्या लक्षद्वीपमध्ये फोटोंसोबत १९८७ मधील राजीव गांधी यांच्या सुट्टीचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.राजीव गांधी त्यावेळी कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रांसोबत लक्षद्वीपमध्ये सुट्टी साजरा करण्यासाठी गेले होते. त्यांच्या या दौऱ्यासाठी व्हीव्हीआयपी व्यवस्था ठेवण्यात आली होती, त्यामुळे वाद निर्माण झाला होता.

आयएनएस विराटचा वापर

विशेष म्हणजे राजीव गांधी यांनी यावेळी आयएनएस विराटचा वापर केला होता. पंतप्रधान गांधी यांच्या सुरक्षेसाठी आयएनएस विराट (INS Virat) १० दिवसासाठी अरबी समुद्रात तैनात करण्यात आले होते. आयएनएस विराट तैनात करणे खूप खर्चिक काम होतं. कारण, मोठ्या प्रमाणात कर्मचारीही याठिकाणी असायचे. आयएनएस विराट भारतीय नौसेनेची एक प्रमुख युद्धनौका होती.

इंडिया टूडेच्या माहितीनुसार, पत्रकार अनीता प्रताप यांनी यासंदर्भातील माहिती समोर आणली होती. राजीव गांधी यांनी सुट्टीसाठी विराटचा वापर केला असल्याने वाद निर्माण झाला होता. पण, तो लवकरच निवळला. त्याचदरम्यान बोफोर्स घोटाळ्याची घटना समोर आली होती. त्यामुळे मीडियाचे लक्ष या घोटाळ्याकडे गेले होते. शिवाय गांधी यांनी यावेळी एक डॉल्फिन माशाला वाचवलं होतं.

२०१९ मध्ये मोदींनी केली होती टीका

२०१९ मध्ये पंतप्रधान मोदी दिल्लीमध्ये रामलीला मैदानात एक जनसभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी राजीव गांधी यांच्या या दौऱ्यावर टीका केली होती. तुम्ही कधी ऐकलंय का सुट्टी साजरा करण्यासाठी आयएनएस विराटचा वापर करण्यात आला? तेव्हा असं झालं होतं. तेव्हा राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते, असं म्हणत मोदींनी हल्लाबोल केला होता.

मोदी म्हणाले होते की, राजीव गांधी यांनी आपल्या सासरच्या लोकांना सुट्टीसाठी लक्षद्वीपला नेलं होतं. यावेळी त्यांनी आयएनएस विराटवर सुट्टी साजरी केली. राजीव गांधी यांचे सासरटे इटलीचे होते. त्यांना आयएनएस विराटमध्ये प्रवेश देण्यात आला. ही राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड नव्हती का? त्यांनी आयएनएस विराटचा वापर टॅक्सीच्या स्वरुपात केला. कर्मचारी आणि हेलिकॉप्टरचा देखील वापर केला. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT