rihanna 
देश

fact check: रिहाना खरंच पाकिस्तानची हस्तक आहे का? जाणून घ्या फोटोमागचं सत्य

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटी आणि पॉपस्टार रिहानाने केलेल्या एका ट्विटमुळे भारतात चर्चांना उधाण आलं आहे. भारतात शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध करत आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला समर्थन करत तिने एक ट्विट केलं होतं. तिच्या या एका ट्विटमुळे भारतातील राजकारण ढवळून निघताना दिसत आहे. रिहानाच्या ट्विटनंतर भारतीय कलाकारांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी रिहानाला ट्विटद्वारे सुनावलं, तर काहींनी तिला पाठिंबा दिला. त्यातच रिहानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. 

कृषी कायद्यांमध्ये काळं काय आहे? मला शेतकऱ्यांनी पटवून द्यावं- कृषीमंत्री

पॉपस्टार रिहानाने हातात पाकिस्तानचा झेंडा घेतलेला एक फोटो व्हायरल केला जात आहे. रिहाना एका क्रिकेट स्टेडियममध्ये उभी आहे आणि तिच्या हातात पाकिस्तानचा झेंडा दिसत आहे. तिचा हा फोटो शेअर करत अकेनांनी तिच्यावर बेताल टीका केली आहे. रिहाना कशी पाकिस्तान धार्जिनी आहे. तसेच भारताला तोडण्यासाठी तिनं शेतकऱ्यांना समर्थन दर्शवले असल्याचा प्रचार या फोटोच्या माध्यमातून केला जात आहे. भाजप युवा मोर्चाचा नेता अभिषेक मिश्रानेही हा फोटो शेअर केला आहे. 

फॅक्ट चेक

रिहानाच्या या फोटोबाबत पडताळणी केल्यास हा फोटो फोटोशॉप केल्याचं स्पष्ट होत आहे. रिहाना प्रत्यक्षात वेस्ट इंडिज क्रिकेट टीमचा झेंडा स्टेडियममध्ये हातात घेतला होता. 2019 वर्ल्ड कप दरम्यानचा हा फोटो आहे. आयसीसीने International Cricket Council हा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता त्यात ती वेस्ट इंडिजचा झेंडा हातात घेतल्याचं स्पष्ट दिसत आहे. तिने पाकिस्तानचा फोटो हातात घेतल्याचा व्हायरल फोटो फेक असून तो इडिट करण्यात आला आहे. 

दरम्यान, रिहानाचे एक ट्विट भारत सरकार गंभीरतेने घेताना दिसत आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने रिहानाच्या ट्विटनंतर प्रतिक्रिया दिली होती. बाहेरील कोणत्याही व्यक्तीला आमच्या अंतर्गत प्रकरणात बोलण्याचा अधिकार नाही. आम्ही एकसंध असून आमची एकता कोणीही मोडू शकत नाही. हा प्रोपेगेंडा काम करणार नाही, असं मंत्रालयाने म्हटलं. भारतरत्न प्राप्त सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, क्रिकेटर विराट कोहली या बड्या कलाकारांनी ट्विट करत रिहानाच्या ट्विटचा निषेध  केला होता. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Maharashtra News Updates : मोटारसायकल चोराला अटक, तीन बाईक्स जप्त

उपमुख्यमंत्री शिंदेंनी कोणत्या अधिकाराखाली स्थगिती दिली? हायकोर्टाची विचारणा, बेकायदा इमारत प्रकरणी अडचणी वाढणार

Mahadevi Elephant : कोल्हापूरकरांच्या लढ्याला येणार यश? नांदणी मठाच्या 'महादेवी'साठी उच्चस्तरीय समिती घेणार निर्णय

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार; ब्रह्मपुरी तालुक्यातील लाखापूर येथील घटना

SCROLL FOR NEXT