famous markets heera panna palika bazaar are in notorious markets list 2021 check details rak94 
देश

भारतातील हे बाजार आहेत जगात कुप्रसिद्ध, अमेरिकेने प्रसिध्द केली यादी

सकाळ डिजिटल टीम

नुकतेच प्रसिध्द करण्यात आलेल्या जगातिल कुख्यात बाजारांच्या यादीत देशातील काही लोकप्रिय बाजारांचा उल्लेख करण्यात आला आहे. यूएस ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह (US Trade Representative) द्वारे दरवर्षी ही यादी जाहीर केली जाते. दरम्यान या यादीमध्ये नवी दिल्ली, मुंबई कोलकाता येथील बाजारांसोबतच लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट IndiaMart.com याचा देखील या यादीत समावेश आहे. (Notorious Markets list 2021)

प्रसिद्ध केली यादी

यूएस ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह (USTR) ने प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वात कुख्यात बाजारांच्या लेटेस्ट वार्षिक यादीमध्ये भारतातील या बाजारांचा समावेश करण्यात आला आहे. 2021 वर्षामध्ये सर्वात कुख्यात ठरलेल्या बाजारांची यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली या यादीमध्ये जगभरातील 42 ऑनलाइन आणि 35 पारंपारिक बाजारपेठांचा समावेश आहे. जे बाजार बनावट ट्रेडमार्क किंवा कॉपीराइट चोरीमध्ये गुंतलेले आहेत. यादीतील इतर तीन भारतीय बाजारपेठा मुंबईतील हीरा पन्ना, कोलकातामधील किद्दरपोरे (Kidderpore) आणि दिल्लीतील टँक रोड या आहेत.

अमेरिकेला या गोष्टीची चिंता

यूएस व्यापार प्रतिनिधी कॅथरीन पाई यांनी सांगितले की, "बनावट आणि पायरेटेड वस्तूंच्या जागतिक व्यापारामुळे अमेरिकन क्रिएटीव्हिटी आणि सर्जनशीलता कमी होते आणि अमेरिकन कामगारांचे नुकसान होते." दरम्यान दिल्लीतील पालिका बाजार आणि टँक रोड हे घाऊक आणि किरकोळ वस्तूंसाठी खूप प्रसिद्ध आहेत. येथे खरेदीदारांची मोठी गर्दी असते आणि स्वस्तात खरेदीसाठी लोक या बाजारांना प्राधान्य देतात.

खोटे आरोप मागे घ्या

मात्र दिल्लीच्या पालिका बाजार असोसिएशनने बदनाम बाजारांच्या यादीत पालिका बाजाराचा समावेश केल्याबद्दल आक्षेप घेत असे खोटे आरोप मागे घेण्याची मागणी केली आहे. पालिका बाजार असोसिएशनचे अध्यक्ष दर्शनलाल कक्कर म्हणाले, 'अमेरिकन ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनने प्रसिद्ध केलेल्या कुप्रसिद्ध बाजारांच्या यादीत पालिका बाजारचे नाव असणे ही अत्यंत धक्कादायक बाब आहे.'

दिल्लीच्या टँक रोड येथे असलेला पालिका बाजाराविषयी रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, स्वस्त किमतीत ट्रेंडी वस्तू खरेदी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये हे प्रसिद्ध आहे तसेच याचे पर्यटकांमध्येही हे आकर्षण असल्याचे म्हटले आहे. तसेच IndiaMART ही एक ई-कॉमर्स वेबसाइट आणि मोबाइल अॅप आहे जे खरेदीदारांना पुरवठादारांशी जोडते, स्वतःला जगातील दुसऱ्या क्रमांकाची ऑनलाइन business-to-business बाजारपेठ म्हणवणाऱ्या या बाजारात बनावट वस्तू, बनावट औषध, इलेक्ट्रॉनिक्स आणि कपडे मोठ्या प्रमाणात मिळतात असे यामध्ये नमुद केले आहे. मुंबईत असलेली हीरा पन्ना येथे तुम्हाला बनावट घड्याळे, पादत्राणे, अॅक्सेसरीज आणि सौंदर्यप्रसाधने मिळतात. अशाच प्रकारची माहिती कोलकाता येथील किद्दरपोरे बाजाराबद्दल देण्यात आली आहे

छापे घालणे कठीण

इतकेच नाही तर रिपोर्टमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की या ठिकाणी कारवाई करणे आव्हानात्मक आहे, कारण बाजार निवासी भागात स्थित आहेत आणि विक्रेत्यांना छाप्यांबद्दल आधीच माहिती असते, ज्यामुळे छापा टाकण्याचा फारसा उपयोग होत नाही असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fadnavis: मुख्यमंत्र्यांसमोर शस्त्र ठेवून माओवादी नेता भूपती शरण येणार? ६० सहकाऱ्यांसह शरणागती, १० कोटींचं होतं बक्षीस

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

PMC Election : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर; ६ नोव्हेंबरला प्रारूप तर १० डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार

Ajinkya Rahane: 5-6 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या खेळाडूंनी निवड समितीत असावं, नाहीतर...; रहाणेचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT