Farmer-Agitation-Delhi 
देश

केंद्र सरकारने आगीशी खेळू नये; शेतकरी नेत्यांचा इशारा

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या प्रस्तावात वेगळे काहीच नाही. पुन्हा चर्चा सुरू करायची असेल तर सरकारने कायदे रद्द करण्यासह शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत स्वच्छ मनाने नवा ठोस प्रस्ताव लेखी स्वरूपामध्ये द्यावा, अशी आक्रमक भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे. या नेत्यांनी आज केंद्र सरकारचा प्रस्ताव  साफ फेटाळून लावला. या आंदोलनाला या सरकारने कमी लेखू नये व तसे करून आगीशी खेळू नये असाही इशारा देण्यात आला.

तीन कृषी कायदे रद्द करण्यासह अन्य मागण्यांवर गेले २७ दिवस ठाम असलेले आंदोलनकर्ते शेतकरी व ‘तेवढे सोडून बोला’ या भूमिकेवर कायम असलेले सरकार यांच्यातील तिढा नजीकच्या काळात सुटण्याची शक्‍यता कमीच आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरकारने पाठविलेल्या चर्चेच्या ताज्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी ४० शेतकरी नेत्यांची बैठक सिंघू सीमेवर झाली. त्यानंतर दर्शन पाल, जगदीपसिंग डल्लेवाल, शिवकुमार कक्काजी, योगेंद्र यादव, हनन मौला, राजिंदरसिंग आदी नेत्यांनी सांगितले की, ‘संयुक्त शेतकरी संघर्ष समिती आघाडीकडून कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव विवेक अग्रवाल यांच्या नावे सरकारच्या प्रस्तावाला येत्या २ दिवसांत उत्तर पाठविले जाईल. कायद्यात दुरुस्त्या वगैरे आम्हाला मान्य नाही व ही मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच राहील.’’  सरकारने कायद्यांत दुरुस्त्यांचे तेच तेच पुन्हा  सांगण्यापेक्षा स्पष्ट काही तरी सांगावे तरच चर्चा पुढे सुरू होईल, असे महाराष्ट्रातील प्रतिनिधी संजय गिड्डे व शंकर दरेकर यांनी सांगितले.

‘पीएम किसान’चे शुक्रवारी वितरण 
शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीअंतर्गत दिल्या जाणाऱ्या त्रैमासिक दोन हजार रुपयांच्या मदतीचा पुढील हप्ता २५ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते इलेक्ट्रॉनिक व्यवस्थेद्वारे वितरित केला जाणार आहे. याद्वारे ९ कोटी शेतकऱ्यांना १८ हजार कोटी रुपयांहून अधिक निधी हस्तांतरित केला जाईल. यावेळी सहा राज्यांमधील शेतकऱ्यांशी पंतप्रधान मोदी संवाद साधतील. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर हे देखील यात सहभागी होतील. पीएम किसान योजनेत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी २००० रुपये याप्रमाणे वार्षिक ६००० रुपयांची मदत केली जाते. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाते.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नावे चक्क पिवळं रेशनकार्ड, अज्ञातावर गुन्हा दाखल

Pune Metro Expansion : पुणे मेट्रोचा विस्तार २०० किलोमीटरवर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो भवनचे उद्‍घाटन

CM Devendra Fadnavis : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मे मध्ये धावणार; २३ किलोमीटरच्या मार्गिकेचे दोन टप्प्यांत उद्‍घाटन

Dharashiv Accident: तुळजापूर-लातूर महामार्गावर भीषण अपघात; तीन वाहनांची धडक, एक ठार

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT