gobar main.jpg 
देश

Farmer Protest: भाजपच्या माजी मंत्र्याच्या घरासमोर शेतकऱ्यांनी टाकलं ट्रॉलीभर शेण

सकाळ ऑनलाइन टीम

चंदीगड- गेल्या एक महिन्याहून अधिक काळापासून दिल्लीच्या सीमेवर नवीन कृषी कायद्यावरुन शेतकरी आंदोलन सुरु आहे. आपल्या मागण्यांवर आंदोलक शेतकरी ठाम आहेत. मोदी सरकार आणि भाजपविरोधात शेतकऱ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, पंजाबमधील होशियारपूर येथे काही जणांनी भाजपच्या एका नेत्याच्या घरासमोर ट्रॉलीभरुन शेण टाकले. आंदोलकांच्या या कृत्यावर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नाराजी व्यक्त केली असून अशा प्रकारचे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी पंजाबचे माजी मंत्री तीक्ष्ण सूद यांच्या घरासमोर ट्रॉलीभरुन शेण फेकून विरोध दर्शवला. 

या आंदोलक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या उदासीन भूमिकेविरोधात घोषणाबाजीही केली. त्यानंतर तीक्ष्ण सूद यांच्या भाजप समर्थकांनी त्यांच्या नेतृत्त्वाखाली राय बहादूर जोधमल रस्त्यावर धरणे धरले आणि शेण फेकणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. याचदरम्यान पंजाबचे भाजप प्रमुख अश्विनीकुमार शर्मा यांनी या घटनेचा निषेध केला आहे. 

शर्मा म्हणाले की, शेतकरी म्हणून आलेल्या काही उपद्रवी लोकांनी सूद यांच्या निवासस्थानावर हल्ला केला आहे. राज्यातील शांतता आणि बंधुत्वाला बाधा आणण्यासाठी हे करण्यात आले आहे, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या घटनेची दखल घेतली असून अशा प्रकारच्या कृत्यातून शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा हेतू आणि उद्देश बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WOMEN'S ASIA CUP 2026 FINAL: पाकिस्तानचा पत्ता कट अन् भारतासमोर श्रीलंकेचं आव्हान! महिला एशिया कप फायनल कधी, कुठे आणि किती वाजता?

CM Devendra Fadnavis : विदर्भ बनणार ‘मायनिंग-ग्रीन स्टील हब’; खाण क्षेत्र अर्थव्यवस्थेत अर्धा ट्रिलियन डॉलरचे योगदान

मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ ते ९ किमी रांगा; प्रवाशी संतप्त

Marathi News Live Updates : पुण्याजवळ पाबे घाटात ट्रक दरीत कोसळला, दोघे जखमी

Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

SCROLL FOR NEXT