rakesh tikait File Photo
देश

कायदे रद्द केल्याशिवाय घरी परतणार नाही: राकेश टिकैत यांचा निर्धार

शेतकरी विरोधी तीन कायदे रद्द केल्याशिवाय शेतकरी घरी परतणार नाही. आंदोलनाची जागा आता शेतकऱ्यांचे घर बनली आहे. त्यामुळे लसीकरणासाठी या ठिकाणीच सुरू करावे, असे भारतीय किसान संघटनेचे नेते राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली- शेतकरी विरोधी तीन कायदे रद्द केल्याशिवाय शेतकरी घरी परतणार नाही. आंदोलनाची जागा आता शेतकऱ्यांचे घर बनली आहे. त्यामुळे लसीकरणासाठी या ठिकाणीच सुरू करावे, असे भारतीय किसान संघटनेचे नेते राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले. नवीन शेती कायद्याच्या विरोधात शेकडो शेतकरी सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देऊन आहेत. शेतकरी आंदोलनासाठी एकत्र येत असल्याने कोरोनाचा फैलाव होत असल्याचा आरोप होत आहे. त्यावर टिकैत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

टिकैत म्हणाले, ‘‘आंदोलन स्थळ हेच आता शेतकऱ्यांचे घर झाले आहे. ते सोडून त्यांना कुठे जायला सांगणार? कोरोनाचा फैलाव काय येथून होतोय का? हे तर आमचे घर आहे. अनेक शेतकऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. अनेक जण दुसरा डोस मिळावा म्हणून झगडत आहेत. त्यासाठी अधिकाऱ्यांनी येथेच लसीकरण सुरू करावे.’’

इफ्तारवेळी शेतकऱ्यांची कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोपही केला जात आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहो. त्यावर टिकैत म्हणाले, की पन्नास जणांना एकत्र येण्यास सरकारची परवानगी आहे. तिथे फक्त २२ ते ३५ लोक होते. तेही पुरेसे अंतर ठेऊन बसलेले होते. कुणी कुणास भेट नाही आणि हस्तांदोलनही केले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bagless Days: विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय! सरकारी शाळांमध्ये 'बॅगलेस डे' लागू; राज्य सरकारची मोठी घोषणा

Video : कर्तव्यापलीकडे माणुसकी! एक्सप्रेस वेवर अडकलेल्या प्रवाशांना पाणी अन् अन्नाचं वाटप; ट्रॅफिकमधील लोकांसाठी पुणे पोलीस ठरले देवदूत

Girish Mahajan : 'उरलासुरला पक्ष वाचवायचा असेल तर राऊतांना बाजूला सारा'; महाजनांचा उद्धव ठाकरेंना थेट सल्ला

Latest Marathi News Live Update : पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या सर्व एस टी बसच्या फेऱ्या रद्द

Gold Extraction from SIM Card : पठ्ठ्याने जुन्या सिमकार्डसमधून काढले २६ लाखांचे सोने, व्हिडिओ केला शेअर, लोक म्हणाले- हा तर आधुनिक किमयागार

SCROLL FOR NEXT