time magazine cover. 
देश

आम्ही का परत जावं? ‘टाईम’ च्या मुखपृष्ठावर महिला शेतकरी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - ‘आम्हाला कोणी धमकावू शकत नाही, आम्हाला कोणी खरेदी करू शकत नाही’, या ओळींसह जगप्रसिद्ध ‘टाईम’ नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर दिल्लीच्या सीमांवरील आंदोलनकर्त्या महिला शेतकऱ्यांना स्थान मिळाले आहे. ‘टाईम’च्या ताज्या अंकात शेतकरी आंदोलनाचा वृत्तांत असून मुखपृष्ठावर आंदोलनकर्त्या महिलांच्या छायाचित्राखाली वरील निर्धाराची ओळ टाकण्यात आली आहे. ‘ऑक्‍सफेम इंडिया’च्या अहवालानुसार भारतात ८५ टक्के ग्रामीण महिला शेतीच्या कामांत सक्रिय असतात. मात्र केवळ १३ टक्के महिलांकडे शेतीची मालकी आहे. या आंदोलनाकडे जगभरातील प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले गेले. अनेक जागतिक माध्यमांच्या प्रतिनिधींनी दिल्लीच्या सीमांवर नियमितपणे जाण्याचा शिरस्ता सतत सुरू ठेवला आहे. त्यानंतर आता ‘टाईम’च्या मुखपृष्ठावरच शेतकरी आंदोलन झळकले आहे. 

छायाचित्रात टिकरी सीमेवरील २० महिला आंदोलकांचे छायाचित्र आहे. या आंदोलनात महिलांचाही सहभाग किती व्यापक व मनापासून आहे, हे ‘टाईम’च्या वृत्तांतात म्हटले आहे. ‘आम्हाला धमक्‍या दिल्या जाऊ शकत नाहीत व आम्हाला खरेदी केले जाऊ शकत नाही,’ या ओळींतून आंदोलन संपविण्यासाठी करण्यात आलेल्या कारवायांचीच झलक पहायला मिळते.

‘काले कानून वापस लो’, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेल्या देशभरातील हजारो शेतकऱ्यांना जगभरातून वाढता पाठिंबा मिळत असल्याचे हे आणखी एक उदाहरण मानले जाते. गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनात एकीकडे सरकारने शेतकरी नेत्यांबरोबर चर्चेच्या ११ फेऱ्या केल्या. कायदे मागे घेणार नाही, ही भूमिका सरकारने कायम ठेवल्याने त्या निष्फळ ठरल्या.

दुसरीकडे आंदोलकांबाबत वेगवेगळी माहिती सरकारच्या गोटातून पसरविली गेली. शेतकरी काय खातात, इथपासून या आंदोलनात देशविघातक शक्तींचा सहभाग असल्याचा प्रचार अनेक केंद्रीय मंत्र्यांकडून सुरू होता व आहे. २६ जानेवारीच्या लाल किल्यावरील हिंसाचारानंतर आंदोलनच संपणार अशी कुजबूज सुरू झाली. मात्र इतका दुष्प्रचार करूनही हजारो शेतकऱ्यांचा निर्धार पक्का असल्याचे दिसून आले.

आम्ही परत का जावे?
या आंदोलनात पंजाब, हरियाना व ग्रामीण उत्तर प्रदेशांतून मोठ्या संख्येने महिला जमल्या आहेत. मात्र आंदोलनाच्या नेतृत्वात त्यांना सहभागी करून घेतले गेले नाही काय? असाही मुद्दा यात उपस्थित करण्यात आला. रामपूरहून आलेल्या ७४ वर्षीय जसबीर कौर यांनी ‘टाईम’च्या प्रतिनिधीला ‘हे केवळ पुरूषांचेच आंदोलन नाही. आम्ही कोण आहोत, येथे का आलो आहोत? आम्ही का परत जावे?’ असा सवाल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasla Dam Water Discharge : पुणेकरांनो सावधान! दुपारी 12 वाजता खडकवासल्यातून 22,880 क्युसेकने विसर्ग; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, धरणाच्या साखळीत 'मुसळधार'

Shehzad Poonawalla Resignation : पंतप्रधान मोदींचे कट्टर समर्थक शहजाद पूनावाला यांचा भाजपचा राजीनामा; राष्ट्रीय प्रवक्त्याने पक्ष का सोडला?

Bhiwandi Building Collapse: आम्ही बाहेर पडलो, पण आमची लेक ढिगाऱ्याखालीच अडकली अन्..., भिवंडी दुर्घटनेतील पीडितांनी सांगितला थरार!

Latest Marathi News Live Update : चाकण-शिक्रापूर मार्गावर कंटेनर बंद पडण्याचे प्रकार वाढले; वाहतूक पूर्णपणे जाम

Nagpur Accident News: भीषण अपघातात मायलेकाचा मृत्यू; नवरगाव शिवारातील घटना; मद्यधुंद चालक अटकेत

SCROLL FOR NEXT