farmer protest
farmer protest sakal
देश

सहनशीलतेचा अंत नका पाहू; उद्या शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन

सुधीर काकडे

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सोमवारी 18 ऑक्टोबर रोजी रेल रोको करण्यात येणार आहे. भारतीय किसान युनीयनचे नेते गुरनाम सिंग चढूनी यांनी शेतकऱ्यांना रेल्वे स्थानकांवर जाऊन रेल्वे रोखण्याचे आदेश दिले आहेत. तीन कृषी कायदे रद्द करणे आणि एमएसपीवर पिकांची खरेदी करणे, तसेच लखीमपूरमध्ये झालेल्या घटनेत केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला अटक करणे अशा मागण्या घेऊन शेतकऱ्यांनी या आंदोलन पुकारलं आहे.

दिल्लीच्या वेगवेळ्या सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला आता वर्षभरापेक्षा जास्त काळ उलटून गेलाय. त्यामुळे आता शेतकरी नेते चढुनी यांनी सरकारला इशारा दिला आहे. सहनशीलतेची देखील एक सीमा असते, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका अशा भावना रोहतकमध्ये आयोजिय किसान महापंचायतीमध्ये गुरनाम सिंग चढुनी यांनी व्यक्त केल्या.

उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर आंदोलक शेतकरी संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. हरियाणाचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या विरोधात काठ्या उगारायला सांगतात आणि लखीमपूरमध्ये ही घटना होते, हा योगायोग नाही असंही यावेळी चढुनी यावेळी म्हणाले.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला आता वर्षभरापेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांवर सर्वोच्च न्यायालयाने तुर्तास स्थगिती आणलेली आहे. मात्र हे कायदे रद्द करा ही मागणी घेऊन शेतकरी आंदोलन करत आहेत. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून उद्या रेल रोको आंदोलन केलं जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा जागीच मृत्यू, ८ जखमी

Pre-monsoon Rain : महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांत आज बरसणार पूर्वमोसमी पावसाच्या सरी; नागपूर, भंडारा, गोंदियात गारपिटीचा इशारा

Dabholkar Murder Case: डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना काय होणार शिक्षा? दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर येणार निकाल

Latest Marathi News Live Update : तब्बल 10 वर्षांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा आज निकाल

T20 World Cup स्पर्धेसाठी संधी न मिळताच स्फोटक फलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती; अनेक विक्रम आहेत नावावर

SCROLL FOR NEXT