FB Fraud esakal
देश

FB Fraud : फेसबुकवरील महिलेची मैत्री स्वामींना पडली भारी; जमीनीच्या नावाखाली 35 लाखांचा गंडा

फेसबुकवर मैत्री झाली. मठासाठी जागा देते म्हटली, अन् उलट ३५ लाखाचा चूना लावून गेली.

धनश्री भावसार-बगाडे

FB Fraud : कर्नाटकच्या बेंगळूरूमध्ये कंबालू मठ स्वामी ला एका मुलीने ३५ लाख रुपयांचा चूना लावला. स्वामी चन्नवीरा शिवाचार्य यांची फेसबुकद्वारा एका मुलीशी ओळख झाली. दोघं मागील तीन वर्षांपासून संपर्कात होते. तीने स्वामींना सांगितले होते की, ती मठासाठी १० एकर जमीन देईल. त्या मुलीच्या बोलण्यात फसलेले चन्नवीरा शिवाचार्य यांनी ३५ लाख रुपये तिच्या अकाउंटमध्ये जमा केले. नंतर त्यांना समजले की, त्या मुलीने त्यांना फसवले आहे. मग प्रकरण पोलिसांत गेले.

फेसबुकवरची मैत्री

एजंसीच्या माहितीनुसार बेंगळूरूच्या ग्रामीण भागात नेलमंगला तालुक्यात कंबलू मठ आहे. मठाचे स्वामी चन्नवीरा शिवाचार्य आहेत. २०२० मध्ये त्यांची भेट एका वर्षा नावाच्या मुलीशी फेसबुकवर झाली. तेव्हापासून ते संपर्कात होते. वर्षाने त्यांना ५०० रुपये दिले होते. त्यानंतर तिने त्यांना सांगितलं की ती त्यांना १० एकर जमीन मिळवून देईल. स्वामी तिच्या बोलण्याला फसले.

३५ लाखाला गंडा

काही दिवसांपूर्वी वर्षाने स्वामी चन्नवीरा यांना फोन केला आणि सांगितलं की, ती जमीनेचे कागदपत्र घेऊन येत होती तर काही लोकांनी तिला मारझोड केली. त्यामुळे ती जखमी झाली. सध्या एम. एस. रमैया रुग्णालयात आहे. तिने स्वामींना पैसे पाठवायला सांगितले. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत स्वामींनी ३५ लाख रुपये तिच्या अकाउंटमध्ये जमा केले.

पोलिसात दिली फिर्याद

जेव्हा स्वामींना थोडा संशय आला तेंव्हा त्यांनी आपल्या पातळीवर तपास केला. तेव्हा त्यांना समजले की, वर्षाने त्यांच्याशी खोटं बोलून ३५ लाखाचा चूना लावला आहे. त्यानंतर त्यांनी डबासपेट पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधान परिषद निवडणूक! मतदार सदस्यांना जमा करावी लागणार शस्त्रे, पोलिस अधीक्षकांनी काढले आदेश; सोलापूर जिल्ह्यात ६१६ मतदार, २२ जणांना वैयक्तिक बंदोबस्त

Panchang 27 May 2026 : पद्मिनी एकादशीसह बुधवारी खास योग! जाणून घ्या संपूर्ण पंचांग

आजचे राशिभविष्य - २७ मे २०२६

करिअर वेध : पराकोटीचा ध्यास

विशेष : डिजिटल डिझायनर : मिडजर्नी

SCROLL FOR NEXT