Nirmala_Sitharaman 
देश

Breaking: रेल्वेनंतर आता बँकांच्या खासगीकरणावर केंद्र सरकारचा खुलासा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशातील सर्व बँकांचे खासगीकरण होणार का याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. सर्व बँकांचे खासगीकरण होणार नाही, पण ज्या बँकांचे खासगीकरण होणार आहे, त्या बँकेच्या कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येईल. सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात दोन सरकारी बँकांचे खासगीकरण करण्यात येणार असल्याचे घोषणा केली होती. पण अजूनही त्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रीय कॅबिनेटची बैठक झाली, यावेळी एक नवी नॅशनल बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. देशातील मोठ्या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी ही बँक स्थापन करण्यात येणार असल्याचा उद्देश आहे. या बँकेचे नामकरण विकास वित्त संस्था असे करण्यात आले आहे. या नव्या बँकेची सुरवात शून्यापासून होणार असल्याने सरकार या बँकेला सुरवातीला २० हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. 

सध्या देशातील सर्वच राज्यांमध्ये बँकेचे कर्मचारी दोन दिवसाच्या संपावर आहेत. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सीतारमण यांनी हे विधान केलं आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने हा संप पुकारला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ९ महत्त्वाच्या बँक युनियन यामध्ये सहभागी झाल्या आहेत. 

देशात स्टेट बँक ऑफ इंडियासारख्या बँका बनाव्यात, अशी आमची इच्छा आहे. विकास वित्त संस्थेची स्थापना करण्यामागे हीच अपेक्षा आहे. देशातील सर्व बाजारपेठांची अपेक्षा ही बँक पूर्ण करेल, असा विश्वास अर्थमंत्री सीतारमण यांनी व्यक्त केला. बँकांच्या खासगीकरणाचा निर्णय कर्मचाऱ्यांचे हित पूर्णपणे लक्षात घेऊनच केली जाईल. बँकांच्या खासगीकरणानंतरही या बँका पूर्वीप्रमाणेच काम करतील. त्यामुळे कर्मचाऱ्यांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT