देश

रामदेव बाबांवर FIR! ऍलोपॅथीवरच्या वक्तव्यांचं 'वादासन' भोवलं

विनायक होगाडे

रायपूर : योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर रायपूर पोलिसांनी प्राथमिक चौकशी अहवाल (एफआयआर) दाखल केला. अॅलोपथीबाबत चुकीची माहिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
याप्रकरणी भारतीय वैद्यकीय संघटनेच्या (आयएमए) छत्तीसगड शाखेने तक्रार केली आहे. कोरोना संसर्गावर वैद्यकीय वर्ग, भारत सरकार, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेसह (आयसीएमआर) इतर प्रमुख संस्था वापरत असलेल्या औषधांबाबत बाबा रामदेव यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून टीकात्मक विधाने केल्याचा आरोप आहे. त्यामुळे बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु असल्याचे रायपूरचे वरिष्ठ पोलिस अधिक्षक अजय यादव यांनी सांगितले.

याप्रकरणी आधी आयएमएच्या रुग्णालय मंडळाचे अध्यक्ष डॉ. राकेश गुप्ता, विकास अगरवाल व इतर डॉक्टरांनी तक्रार केली होती. या तक्रारीनुसार बाबा रामदेव यांचे सोशल मिडीयावरील अनेक व्हिडिओ दिशाभूल करणारे आहेत. डॉक्टर, निमवैद्यकीय कर्मचारी, सरकारची सारी आरोग्य केंद्रे आणि प्रशासन एकत्र येऊन कोविड-१९ विषाणूचा मुकाबला करीत असताना बाबा रामदेव यांनी प्रचलित आणि प्रमाणित उपचार पद्धतीबाबत दिशाभूल केली. ९० टक्के रुग्णांना बरे करणाऱ्या आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि अॅलोपथी औषधांबाबत त्यांच्या वक्तव्यांमुळे लोकांचा जीव धोक्यात आला.

अधिसूचनेचा भंग

गेल्या वर्षी १३ मार्च रोजी छत्तीसगड सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेचा बाबा रामदेव यांनी भंग केल्याचाही आरोप आहे. या अधिसूचनेनुसार कोणताही व्यक्ती, संस्था किंवा संघटना मुद्रित किंवा इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांनी कोरोनाविषयी दिलेल्या माहितीचा राज्य सरकारच्या आरोग्य खात्याच्या पूर्वपरवानगीशिवाय वापर करणार नाही. अफवा किंवा अनधिकृत माहितीचा प्रसार टाळण्याचा यामागील उद्देश आहे.

बाबा रामदेव यांच्यावरील गुन्हे


१) कलम १८८ (जनतेच्या सेवकांनी रीतसर मंजूर केलेल्या आदेशाची अवज्ञा)
२) कलम २६९ (प्राणघातक रोगाच्या प्रसारास कारणीभूत ठरेल असे हलगर्जीपणाचे कृत्य)
३) कलम ५०४ (शांततेचा भंग होण्यास चिथावणी देण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्सर अवमान करणे)
याशिवाय इतर कलमे आणि २००५च्या आपत्ती निवारण कायद्याच्या तरतुदींच्या
भंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT