Fire in Hospital at madhya pradesh Fire in Hospital at madhya pradesh
देश

Fire In Hospital : जबलपूरच्या खाजगी रुग्णालयात भीषण आग; १० जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

जबलपूर : मध्य प्रदेशातील जबलपूर शहरातील खाजगी रुग्णालयाच्या (Hospital) दुसऱ्या मजल्यावर आग (Fire) लागली. या आगीत १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये बहुतांश रुग्णालयातील कर्मचारी आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, मध्य प्रदेशातील दमोह नाका शिवनगर येथील न्यू लाइफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तेथे उपस्थित असलेल्या लोकांनाही बाहेर काढण्यात येत आहे. या आगीत (Fire) अर्धा डझनहून अधिक लोक जळाले आहेत.

आगीत अनेक रुग्ण जिवंत जळाले आहेत. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. आगीमुळे रुग्णालयात बराच वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्णालयातून (Hospital) सुमारे सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रुग्णालयात किती रुग्ण दाखल झाले याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

रुग्णालयामध्ये सुमारे १०० लोकांचा स्टाफ आहे. मात्र, एकूण मृतांचा आकडा किती असावा याबाबत साशंकता आहे. आता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की, दमोह नाका येथून काही लोक निघत असताना हॉस्पिटलमध्ये आग लागल्याचे दिसले तेव्हा ही घटना उघडकीस आली.

आरडाओरडाही केल्यानंतर लोकांनी तत्काळ पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. मात्र, आग इतकी भीषण होती की अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आग सर्वत्र पसरली होती. आगीचे कारण समजू शकले नाही. आग आटोक्यात आणली असली तरी रुग्णालयात अनागोंदी आहे. दाखल झालेल्या रुग्णांना बाहेर काढण्यात आले असून, त्यांना इतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT