first batch of pilgrims leave for amarnath yatra from jammu yatri niwas base camp culture esakal
देश

Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रेला जम्मूत सुरुवात

कडक सुरक्षाव्यवस्थेत सुमारे ३,४००हून अधिक भाविकांची ही तुकडी काश्मीरातील बेस कॅंपच्या दिशेने रवाना झाली.

सकाळ वृत्तसेवा

जम्मू : जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी वार्षिक अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरुंच्या पहिल्या तुकडीला आज सकाळी जम्मूतील भगवती नगर कॅम्प परिसरातून हिरवा झेंडा दाखविला.

कडक सुरक्षाव्यवस्थेत सुमारे ३,४००हून अधिक भाविकांची ही तुकडी काश्मीरातील बेस कॅंपच्या दिशेने रवाना झाली. त्यानंतर ती दक्षिण काश्मीरमधील हिमालयातील समुद्रसपाटीपासून ३,८८० मीटर उंचीवरील अमरनाथ गुंफेचा पुढील प्रवास करेल.

भाजप नेते देवेंदरसिंह राणा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की नायब राज्यपालांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर आज अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली. यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाने सर्वोत्तम सुविधा दिल्या आहेत.

केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) या तुकडीला संरक्षण पुरविले असून लष्कर तसेच पोलिसही महामार्गावर तैनात करण्यात आले होते. सुमारे ६२ दिवसांच्या अमरनाथ यात्रेला शनिवारी (ता.२४) सुरुवात होत आहे. यात्रेचा नुनवान-पहेलगाम हा अनंतनाग जिल्ह्यातील ४८ कि.मी.चा पारंपारिक मार्ग असून गांदेरबाल जिल्ह्यातील १४ कि.मी.चा कमी अंतराचा मात्र अधिक उंचीवरील दुसरा मार्ग आहे.

तत्काळ नोंदणीसाठी पाच केंद्रे

जम्मूचे उपायुक्त अवनी लवासा यांनी सांगितले, की यात्रेसाठी जम्मूमध्ये ३३ निवास केंद्रे स्थापन केली आहेत. त्याचप्रमाणे, नोंदणी केंद्रांना रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) टॅग्जही वितरित करण्यात आले आहेत. यात्रेकरूंना तत्काळ नोंदणीसाठी पाच केंद्रे सुरु करण्यात आली असून त्यातील दोन केंद्रांवर साधुसंतांची नोंदणी केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinnar Bus Stand Accident Video : नाशिकच्या सिन्नरमध्ये बसस्थानकातच भीषण अपघात; वेगात आलेली बस थेट फलाटवर उभ्या प्रवाशांमध्ये घुसली

StudyRoom Live Sessions: १२ वी नंतर स्पर्धा परीक्षांची तयारी कशी सुरू करावी? जाणून घ्या सकाळ+ स्टडीरूमचे खास लाईव्ह सेशनमध्ये

India Post App : रांगेत उभे राहण्याची गरज नाही! डाक विभागाचे 'डाक सेवा २.०' ॲप लॉन्च; सर्व टपाल सेवा आता एका क्लिकवर

Horoscope Prediction : उंदीर, वाघ की डुक्कर ! चायनीज ज्योतिषशास्त्रानुसार तुमची रास आणि स्वभाव घ्या जाणून

Yeola Election : येवला नगर परिषद निवडणुकीत मोठा ‘भूकंप’; ‘एबी फॉर्म’ न जोडल्याने नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाचे तब्बल ६९ अर्ज अवैध!

SCROLL FOR NEXT