देश

देशभरात ई-सिगारेटवर बंदी; केंद्राचा निर्णय 

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : ई-सिगारेटवर बंदी घालण्याच्या तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या उत्पादकतेवर आधारित बोनस देण्याच्या महत्त्वाच्या निर्णयावर केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शिक्कामोर्तब केले. ई-सिगारेटवर तत्काळ बंदीसाठी अध्यादेश काढण्याचीही घोषणा सरकारने केली. या निर्णयासोबतच ई-हुक्का पार्लरवरदेखील बंदी लागू होणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आरोग्य खात्याच्या सचिव प्रीती सुदान यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. ई-सिगारेटवर बंदीसाठी सरकारने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगटाची नियुक्ती केली होती. बंदीच्या निर्णयाबद्दल सीतारामन म्हणाल्या की, ई-सिगारेटचे (ईएनडीएस-इलेक्‍ट्रॉनिक्‍स निकोटीन डिलिव्हरी सिस्टीम) उत्पादन, निर्मिती, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री किंवा वितरण, साठवण, जाहिरात करणे, या सर्व प्रक्रियांवर बंदी घातली आहे. ई-सिागरेटचा तरुणांवर होणारा दुष्परिणाम लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. तत्काळ बंदी लागू होण्यासाठी अध्यादेश काढण्यात येईल. संसदेच्या पुढील अधिवेशनात या बंदीसाठीचे विधेयक मंजुरीसाठी सादर केले जाणार आहे. 

ई-सिगारेटचा वापर 11वी, बारावीचे विद्यार्थी तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्येही लक्षणीय असल्याचा आढळून आला असून, त्याचा प्रभाव वाढण्याआधीच हा निर्णय घेतल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. सिगारेटचे व्यसन सोडण्यासाठी ई-सिगारेटची जाहिरातबाजी झाली. परंतु, त्याचेच व्यसन वाढल्याचे आढळून आले असून, सरकारी संस्था "आयसीएमआर'च्या शिफारशीनंतर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी सांगितले. हा निर्णय देशांतर्गत तंबाखू उत्पादकांना मदतीसाठी घेतलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

ई-सिगारेट वापरल्यास

पहिल्या गुन्ह्यासाठी - एक वर्ष तुरुंगवास वा एक लाखापर्यंत दंड किंवा दोन्हीही 

वारंवार गुन्हा केल्यास - तीन वर्षांचा तुरुंगवास आणि पाच लाखांपर्यंतचा दंड किंवा दोन्हीही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

Dapoli Crime : जालगाव येथे जन्मदात्या आई-वडिलांवर मुलाचा कुऱ्हाडीने हल्ला; वडिलांच्या डोक्यावर व हातावर घाव

Pune News : महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख; प्रमाणपत्रासाठी १.०५ लाख अर्ज, यवतमाळ सर्वाधिक; पुण्यात ३,६८७ अर्ज

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

SCROLL FOR NEXT