five die while rescuing calf in well at uttar pradesh 
देश

विहिरीत पडलेले वासरू वाचले पण पाच जण गेले...

वृत्तसंस्था

लखनौ (उत्तर प्रदेश): एका कोरड्या विहिरीमध्ये वासरू पडल्यानंतर ते जोरजोरात ओरडत होते. वासराला वाचविण्यासाठी पाच जण विहिरीत उतरले पण विषारी वायूमुळे त्यांचा मृत्यू झाला. वासराला जीवंत बाहेर काढण्यात आले आहे.

गोंडा गावात ही घटना घडली. गावातील एका कोरड्या विहिरीत एक वासरू घसरून पडले होते. त्याच्या हंबरण्याच्या आवाजाने काही नागरिक विहिरीजवळ जमले. उपस्थितांपैकी पाच जणांनी विहिरीत उतरण्याचा निर्णय घेतला. पण, विहिरीतून आचानक विषारी वायूचे उत्सर्जन झाल्याने या पाचही जणांचा श्‍वास गुदमरून मृत्यू झाला. मात्र, वासराला वाचविण्यात अन्य नागरिकांना यश आले. दुदैव म्हणजे मृत्यू झालेल्या या पाचही व्यक्तींपैकी चार जण एकाच कुटुंबातील आहेत. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने या पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

दरम्यान, पाच जणांचा जीव गेल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हे वासरू या पाच जणांपैकी कोणाचीही नव्हते. वासराचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी विहिरीत उतरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांना जीव गमवावा लागला. हे पाचही जण भाजीपाला तसेच फळे विकण्याचा व्यवसाय करत होते. विक्री करत असलेल्या ठिकाणापासून जवळच ही विहीर आहे. विहिरीतून हंबरण्याचा आवाज आल्याने त्यांनी विहिरीकडे धाव घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Duleep Trophy Final : तिलक वर्मा एकटा लढला, शतकाला एका धावेने हुकला; इशानच्या संघाकडे ३७२ धावांची आघाडी Video

रिल्सचा नाद, इंटरनेट सारखं बंद पडल्यानं व्हिडीओ अडकायचे; ५२ वर्षीय महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

बापरे! कांदा-लसूण सुद्धा खात नाही अक्षय कुमार; दर सोमवारी असतो उपवास, नक्की कारण काय?

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT